inspirationPeople

जेव्हा दुकानात काम करणाऱ्या युवकास मालकाने गळाभेट केली, जाणून घ्या काय सांगितले होते त्याने

एका धनिक व्यक्तीची एक दुकान होते. ते दुकान व्यवस्थित चालवण्यासाठी मालकाने एक युवक नोकरीला ठेवला होता. तो युवक मेहनतीने काम करत असे आणि सोबतच अत्यंत इमानदार होता. तो एवढा जास्त मेहनत करत असे कि एक दिवस देखील आराम करत नव्हता आणि सुट्टी देखील नव्हता करत. पण एक दिवस तो कामावर आला नाही आणि त्याने मालकास कामावर न येण्याचे कारण देखील सांगितले नाही.

मालकास वाटले कि नोकर चांगले काम करतो आणि कधी सुट्टी देखील घेत नाही. आज असे वाटते कि पैसे कमी मिळण्यामुळे त्याने सुट्टी केली आहे. दुसऱ्या दिवशी युवक कामावर परत आला. त्याने मालकास काल न येण्याचे कारण नाही सांगितले आणि मालकाने त्यास विचारले देखील नाही आणि मालक म्हणाले मी तुझा पगार वाढवला आहे. युवकाने ते ऐकले परंतु त्यावर आनंद व्यक्त नाही केला.

यानंतर युवक पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाला. काही दिवसानंतर एक दिवस युवक पुन्हा कामावर नाही आला. यावेळी मालकास राग आला. मालकास वाटले पगार वाढवल्यामुळे युवक आपल्या मनासारखे वागायला लागला आहे. दुसऱ्या दिवशी युवक आपल्या ठरलेल्या वेळी पुन्हा कामावर आला. यावेळी देखील युवकाने कामावर न येण्याचे कारण सांगितले नाही व मालकाने देखील त्यास विचारले नाही आणि मालकाने सांगितले तुझा पगार पुन्हा पूर्वी एवढा करण्यात येत आहे. वाढवलेले पगार मी तुला देणार नाही. युवकाने यावेळी देखील कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तो दुखी झाला नाही किंवा क्रोध व्यक्त केला नाही आणि तो पूर्वी प्रमाणेच मेहनतीने आणि इमानदारीने काम करत राहिला.

महिना पूर्ण झाल्यावर मालकाने युवकास त्याचा जुन्या हिशोबाने पगार दिला. युवकाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव पाहण्यास मिळाले नाहीत. नाही पगार कमी झाल्याचे भाव नाही पैसे कमी मिळत असल्याचे भाव. हे पाहून मालक आश्चर्यचकित झाले. मनात विचार केला कसा युवक आहे हा जेव्हा मी पैसे वाढवले तेव्हा तो आनंदी झाला नाही आणि जेव्हा पैसे कमी केले तेव्हा दुखी देखील झाला नाही. असे का करत आहे हा? काय आहे यामागील कारण?

मालकास राहवले नाही त्यांनी युवकास याचे कारण विचारले. युवकाने सांगितले मालक, जेव्हा मी पहिल्यांदा दुकानात गैरहजर होतो आणि मी सुट्टी घेतली होती त्यादिवशी माझ्या मुलाचा जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी कामावर आल्यावर तुम्ही माझा पगार वाढवला तेव्हा मी समजलो कि परमेश्वराने माझ्या मुलाच्या पोषणासाठी मला पैसे दिले आहेत. हे कारण होते कि मी आनंदी नाही झालो.

तर दुसऱ्या वेळी जेव्हा मी दुकानात गैरहजर होतो आणि मी त्यादिवशी सुट्टी केली त्या दिवशी माझ्या आईचे निधन झाले होते. दुसऱ्याच दिवशी कामावर आल्यावर तुम्ही माझा पगार पुन्हा पहिल्या एवढा केलात. मला त्यावेळी समजले की आपल्या वाटणीचे पैसे माझी आई घेऊन गेली. हा विचार करून मला दुख झाले नाही. हे ऐकून मालक सुन्न झाले आणि त्यांनी युवकाला गळ्यास लावले.

गोष्टीचे सार

जीवनामध्ये सुख दुख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख जाताच दुख येते आणि दुख जाताच सुख येते. आयुष्य याच चक्रामध्ये अडकलेले आहे. आपण आनंदाच्या वेळी जास्त आनंदी होतो आणि दुखी असल्यावर जास्त उदास होतो. आपल्या मनाला नेहमी एक सारखे ठेवले पाहिजे ज्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये आपले मन बदलणार नाही. असे करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. सुखी आणि दुखी राहण्या पेक्षा अधिक जास्त महत्वाचे आहे समाधानी राहणे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button