foodhealth

सावधान… कुरकुरीत पापड नसतात हेल्दी, जाणून घ्या कारणे

जेवताना जर पापड सोबत असेल तर जेवणाची लज्जत अजून जास्त वाढते. वरणभात असो किंवा श्रीखंड पुरी सोबत पापड असेल तर जेवणाचा आनंद दुप्पट होतो. पण तुम्हाला माहित आहे का जेवणाची लज्जत वाढवणारा पापड आरोग्य बिघडवू शकते. खरतर पापड वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पीठा पासून बनवले जाते.

पापड स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रकारचे आर्टिफिशियल फ्लेवर्स आणि कलर एड केले जातात जे आरोग्यावर वाईट परिणाम करतात. चला पाहू पापड खाण्यामुळे कोणते नुकसान होऊ शकतात.

1 पापड म्हणजेच (जवळपास 13 ग्राम)

  • कैलोर‍िज – 35 ते 40 कैलोरी
  • प्रोटीन – 3.3 ग्राम
  • फैट – 0. 42 ग्राम
  • कार्बोहाइड्रेड – 7.8 ग्राम
  • सोडियम- 226 मिली ग्राम

सोडियम बेंजोएटचे प्रमाण

पापडामध्ये सोडियम बेंजोएट सारखे प्रीजार्वटीव (म्हणजेच पापड दीर्घकाळ चांगले ठेवणारे तत्व) चे प्रमाण जास्त असते. सोडियम बेंजोएटमुळे तुमच्या शरीरावर अनेक हानिकारक प्रभाव होऊ शकतात. एका अभ्यासानुसार सोडियम बेंजोएट आणि आर्टफिशल कलर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतात.

मीठाचे जास्त प्रमाण

यामधील मिठाचे प्रमाण सोडियम बेंजोएटचे स्त्रोत बनते. मिठाचे अधिक जास्त प्रमाण देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. यामुळे हाइपरटेंशन, हार्ट डिजीज़, पाण्याची कमी आणि सूज इत्यादीचे कारण होऊ शकते.

एसिडीटी होण्याची भीती

बाजारामध्ये उपलब्ध असलेले पापड विविध प्रकारच्या मसाल्या पासून तयार केले जातात. यामुळे तुमचे पचनतंत्र प्रभावित होऊ शकते आणि तुम्हाला एसिडीटीचा त्रास होऊ शकतो. जास्त पापड खाण्यामुळे पापडाचे पीठ आतड्याच्या आतील भागास कडक बनवतो ज्यामुळे बद्धकोष्ठता होण्याची समस्या होऊ शकते.

तेलाचे जास्त प्रमाण

लोकांना तेला मध्ये तळलेले पापड जास्त आवडीने खातात. त्यामुळे जाहीर गोष्ट आहे कि तळलेल्या पापडामध्ये तेलाचे प्रमाण देखील जास्त होते. जे तुमचे कोलेस्टेरॉल लेवल वाढवून तुम्हाला हृद्य रोगा कडे घेऊन जाऊ शकते.

वजन वाढणे

पापडाचे सेवन केल्यामुळे वजन वाढते कारण यामध्ये 2 पोळी एवढ्या कैलोरी असतात. जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर याचे सेवन करू नका.

अनहाइजीन देखील एक कारण

पापड बनवण्याची पद्धत तुमच्यासाठी एक चिंतेचे कारण होऊ शकते. यास उनामध्ये मोकळ्या जागेत सुकवले जाते. त्यामुळे मोकळ्या जागेतील वायू प्रदुषणामुळे हे खराब होऊ शकतात.


Show More

Related Articles

Back to top button