Connect with us

दर महिन्याला कमवा 25 ते 30 हजार, सरकारने केली मोठी घोषणा

Money

दर महिन्याला कमवा 25 ते 30 हजार, सरकारने केली मोठी घोषणा

जर तुम्ही तुमच्या शहरातच रोजगार मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सरकारच्या या योजनेद्वारे तुम्ही अतिशय कमी खर्चात महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमवू शकता. सरकारच्या या योजनेद्वारे एका वर्षात देशभरात 2000 जनऔषधी सेंटर उघडण्यात येणार आहेत. बीपीपीआयशी निगडित एका अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे. देशभरात सध्या 3 हजार जनऔषधी सेंटर आहेत. त्याद्वारे हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे.

सरकारने यासाठी घेण्यात येणारे आवेदन आणि प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. या योजनेतंर्गत सरकारी औषधांचे दुकान उघडण्यासाठी अडीच लाख रुपयांचे सहाय्य करण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश लोकांना स्वस्त दरात औषधे पुरविणे हा आहे.

कोण उघडू शकते जनऔषधी सेंटर

जनऔषधी सेंटर उघडण्यासाठी सरकारने 3 कॅटिगिरी बनवल्या आहेत

पहिली कॅटेगिरीमध्ये कोणीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर, रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हे सेंटर उघडु शकतो.

दुसऱ्या कॅटिगरीत ट्रस्ट, एनजीओ, प्रायव्हेट हॉस्पिटल, सोसायटी आणि सेल्फ हेल्प ग्रुप सेंटर उघडु शकतात.

तिसऱ्या कॅटेगिरीत राज्य सरकारद्वारे नॉमिनेटेड एजन्सी

दुकान उघडण्यासाठी 120 वर्गफुट जागेत दुकान असणे गरजेचे आहे.

सेंटर उघडण्यासाठी सरकारच्या वतीने 650 पेक्षा जास्त औषधे उपलब्ध करुन देण्यात येतील.

सरकार करेल 2.5 लाख रुपयांची मदत

पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी 2.5 लाखापर्यंत खर्च येतो. सरकार तुम्हाला यासाठी 2.5 लाख रुपये मदत करेल. म्हणजेच तुम्ही विदाऊट इन्वेस्टमेंट हे केंद्र सुरु करु शकता.

कसे मिळेल तु्म्हाला उत्पन्न

तुम्ही तुमच्या दुकानातुन महिन्याला जितकी औषधे विकाल तेवढ्या औषधांचे 20 टक्के कमिशन तुम्हाला मिळेल.

ट्रेड मार्जिन खेरीज सरकार महिन्याभरातील विक्रीवर 10 टक्के इन्सेटिव्ह देईल. ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

अशा रितीने दुकानदाराला ट्रेड मार्जिनशिवाय इन्सेटिव्ह स्वरुपात डबल नफा मिळेल. म्हणजेच जर तुम्ही महिन्याला एक लाखाची औषधे विकलीत तर तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये सहज मिळतील.

अडीच लाखाची मिळेल मदत

हे केंद्र सुरु करण्यासाठी पहिली तुम्हाला एक लाखाची औषधे खरेदी करावी लागतील. सरकारने याचे रीइंबर्समेंट करेल.

दुकानात रॅक, डेस्क बनविण्यासाठी सरकार तुम्हाला एक लाखाची मदत करेल. हा खर्च सरकार तुम्हाला 6 महिन्यात परत करेल.

जनऔषधी सेंटर खोलण्यासाठी लागणाऱ्या संगणक आदी सेटअपवर 50 हजारापर्यंतचा खर्च सरकार तुम्हाला परत करेल.

अर्ज करण्यासाठी हे करणे गरजेचे

सेंटर उघडण्यासाठी रिटेल औषध विक्री करण्याचा परवाना जनऔषधी दुकानाच्या नावे असावा. तुमच्या नावावर आधार किंवा पॅन कार्ड असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला सेंटर उघडायचे असेल तर https://janaushadhi.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करा.

तुम्हाला हा अर्ज रो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया(BPPI)यांच्या जनरल मॅनेजरच्या(A&F)नावाने पाठवावा लागेल.

ब्यूरो ऑफ फॉर्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनऔषधी संकेतस्थळावरही याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top