astrology

दिवाळीच्या रात्री दिसले हे 4 जीव तर समजा तुमच्या घरात माता लक्ष्मी चे आगमन झाले आहे, पहा कोणते आहेत ते जीव

दिवाळीच्या उद्देशाने सर्व लोक आप आपल्या घरा मध्ये साफसफाई करण्यात व्यस्त झाले आहेत. सर्वांचा उद्देश हाच आहे की दिवाळीला आपल्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ झाला पाहिजे. तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की आपण असे का करतो? कारण हिंदू मान्यते अनुसार माता लक्ष्मी त्यांच्याच घरामध्ये प्रवेश करते ज्यांच्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ आहे. याच सोबत असे मानले जाते की दिवाळीच्या रात्री ज्या घरामध्ये सर्वात जास्त प्रकाश असतो तेथे माता लक्ष्मी प्रवेश करते.

पण माता लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये आगमन झाले आहे का नाही हे कसे ओळखावे हा प्रश्न तुम्हाला त्रास देत असेल तर याचे उत्तर ज्योतिष शास्त्रामध्ये आहे. ज्योतिष शास्त्रा अनुसार असे 4 संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला समजते की माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन झाले आहे. आता तुम्हाला ही उत्सुकता निर्माण झाली असेल की हे संकेत कोणते आहेत. तर चला पाहू दिवाळीच्या रात्री असे कोणते 4 संकेत मिळतात ज्यामुळे माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये प्रवेश केला आहे हे आपल्याला समजते.

घुबड दिसणे

 

दिवाळीच्या रात्री घुबडाचे दिसणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीचे वाहन घुबड कधी पण दिसले तर असे समजा की माता लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा आहे. तुम्ही असे समजू शकता की येणाऱ्या काही दिवसा मध्ये तुमच्यावर धनवर्षा होणार आहे. योगायोगानेच घुबड दिसण्यास शुभ मानले गेले आहे.

उंदीर दिसणे

तसे पाहता उंदीर अनेक घरांमध्ये नेहमीच आपला आतंक पसरवताना दिसतात. पण दिवाळीच्या रात्री जर घरात उंदीर दिसला तर समजा की हा देवी लक्ष्मीच्या रुपात तुमच्या घरात आला आहे. उंदीर दिसण्याचा अर्थ पूर्ण वर्ष तुमच्या घरात सुख-शांती आणि समृद्धी टिकून राहील. येणाऱ्या काळात तुमची पैश्या संबंधीच्या समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल. याला सौभाग्याचे प्रतीक पण मानले गेले आहे.

चिचुंद्री दिसणे

चिचुंद्री ही उंदरा सारखीच दिसते. पण आकारात हे मोठे असतात. दिवाळीच्या रात्री चिचुंद्री दिसणे म्हणजे काही योगायोग नाही आहे. या रात्री जर चिचुंद्री दिसली तर ते भाग्य उदय होण्याचे संकेत असते. ही दिसल्यावर समजून जा की तुम्ही फार भाग्यशाली आहात आणि पैश्या संबधीच्या सर्व समस्या आता दूर होणार आहेत.

पाल दिसणे

घरा मध्ये साधारण पणे नेहमी पाल पाहण्यात येते. पण दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर हे शुभ संकेत आहेत. असे मानले जाते की घरामध्ये पाल दिसणे म्हणजे देवी लक्ष्मीचे आगमन झाल्याचा इशारा आहे. दिवाळीच्या रात्री पाल दिसल्यास पूर्ण वर्षभर येणाऱ्या समस्या पासून सुटका मिळते.

दिवाळीच्या रात्री जर यापैकी कोणताही जीव तुम्हाला दिसल्यास समजा की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे. पण हे जीव योगायोगानेच दिसले तर शुभ मानले जाते. जाणूनबुजून या जीवांना पाहिल्यास काही फायदा होत नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button