आपल्याला कोणत्या परिस्थिती मध्ये दुसऱ्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते

आचार्य चाणक्य हे महान नीतिकार पैकी एक मानले जातात. चाणक्य यांनी रचलेली चाणक्य नीती हा ग्रंथ जीवनाला सुखी आणि यशस्वी करण्याचे गुपित सांगतो. जर या नीती दैनिक जीवनात अवलंबल्या तर आपण अनेक अडचणी आणि समस्या पासून वाचू शकतो. चाणक्य नीती मधील सहाव्या अध्यायातील दहावा श्लोक सांगतो कि आपल्याला कधी दुसऱ्याच्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते.

राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञ: पापं पुरोहित:।
भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।।

चाणक्य यांच्या या नीती अनुसार जर देशाची जनता एखादे चुकीचे काम करते तर त्याचे वाईट फळ सरकारला किंवा राजाला मिळते. त्यामुळे सरकार ने लक्ष ठेवलं पाहिजे कि जनता कोणतेही चुकीचे काम करणार नाही. जर राजा किंवा सरकार आपले काम ठीक करत नसेल, आपल्या कर्तव्यांना पूर्ण करत नसेल आणि जनतेच्या विरोधी आहे तर अश्या स्थिती मध्ये राजाच जनते द्वारा केलेल्या चुकीच्या कामासाठी जबाबदार आहे.

सरकार मध्ये मंत्री किंवा सल्लागार आपले काम व्यवस्थित करत नसतील तर राजा ने काही चुकीचे काम केले तर मंत्री आणि सल्लागार त्यास जबाबदार मानले जातात. मंत्री आणि सल्लागार यांचे काम हे आहे कि राजाला योग्य आणि अयोग्य याची माहिती देणे आणि अयोग्य काम करण्यापासून थांबवणे.

कुटुंबामध्ये पती-पत्नीला एक-दुसऱ्याने केलेल्या चुकीच्या कर्माची फळे भोगावी लागतात. जर पती काही चूक करत आहे तर पत्नीला याचे फळ मिळते. पत्नी काही चूक करते तर पतीला याचे फळ भोगावे लागते. समस्यांपासून वाचण्यासाठी त्यांनी एकमेकांना चुकीचे काम करण्यापासून थांबवले पाहिजे.

चाणक्य यांच्या अनुसार जेव्हा एखादा शिष्य चुकीचे काम करतो तर त्याचे वाईट फळ गुरूला मिळते. गुरुचे हे कर्तव्य आहे कि शिष्यास चुकीच्या मार्गाने जाण्यापासून थांबवणे आणि योग्य काम करण्यास प्रेरित करणे. जर गुरु ने असे नाही केलं तर शिष्य भरकटतो. याचा दोष गुरुलाच लागतो.