astrology

या दोन रंगाचे कपडे परिधान करून पूजा करू नये, अन्यथा ईश्वर क्रोधीत होतात

पूजापाठ करण्याचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे आणि लोक आपल्या श्रद्धेनुसार इष्टदेवतेची पूजा करतात. परंतु बहुतेक लोकांना पूजा करत असतांना कोणते नियम पाळावेत हे माहीत नाहीत. खरतर शास्त्रांमध्ये रोज पूजा पाठ करण्यासाठी कोणते नियम पाळावेत याबद्दल सांगितले आहे. पूजा करताना विशेष सावधानी घेण्याची आवश्यकता असते अन्यथा आपल्याकडून केली गेलेली पूजा-अर्चना स्वीकारली जात नाही. आज आम्ही तुम्हाला पूजा करताना कोणते नियम पाळावेत याबद्दल माहिती देत आहोत.

पूजा करणे म्हणजे मनुष्याने ईश्वरा सोबत संपर्क करण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे असे करताना योग्य ती सावधानी घेणे आवश्यक आहे. यासाठी शास्त्रात सांगितलेले नियम पाळणे आवश्यक आहेत.

खरंतर वराह पुराणामध्ये स्वतः भगवान वराह यांनी पूजा कशी करावी याचे नियम सांगितले आहेत. पौराणिक मान्यता मध्ये भगवान वराह, भगवान विष्णुच्या दशावतारा मधील तिसरे अवतार मानले गेले आहे. वराह पुराणामध्ये 217 अध्याय आणि जवळपास दहा हजार श्लोक आहेत ज्यांमध्ये भगवान वराह धर्मोपदेश कथा सांगतात. हे उपदेश कथांच्या माध्यमातून सांगितले आहेत ज्यामध्ये पूजा करण्यासंबंधीचे नियम आहेत ज्यांचे पालन न केल्यास व्यक्तीला पापाचे हिस्सेदार व्हावे लागते. जसे की…

वराह पुराणानुसार पूजा करताना कोणी काळे किंवा निळे कपडे परिधान केले असतील तर ती पूजा मानली जात नाही.

भगवान वराह उपदेशानुसार, अपराध करून जमा केलेल्या धनाने पूजा किंवा सेवा करणे उपासना करणे म्हणजे पूजा मानली जात नाही तर तो एक अपराधच असतो.

शव स्पर्श केल्यानंतर बिना स्नान करता पूजा करणे स्वीकार्य नाही.

संभोग केल्यानंतर बिना स्नान करता पूजा करणे अपराध आहे.

जर क्रोधित होऊन उपासना केली तर ती स्वीकार्य नाही आहे.

वरहा पुराणानुसार अंधारामध्ये देवाच्या मुर्ती आणि फोटोला स्पर्श करणे आणि पूजा करणे अपराध मानले गेला आहे.

घंटी-शंख यांचा आवाज न करता पूजा करणे हे स्वीकारले जात नाही

जर कोणी पूजा केल्यानंतर वायफळ बडबड आणि विनाकारण बकवास करत असेल तर अशी पूजा स्वीकारली जात नाही.

जर कोणी खाल्ल्या नंतर बिना गुळणी (तोंड स्वच्छ) करता पूजा केली तर ती मान्य होत नाही.

दिव्याला स्पर्श करून नंतर हात न धुताच जर पूजा केली तर ती मान्य होत नाही


Show More

Related Articles

Back to top button