astrology

या पद्धतीने करा हनुमानाची पूजा आणि नंतर नारळ फोडा, दूर होईल कठीण काळ

हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला फार महत्व आहे. प्रत्येक व्यक्ती देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देवीदेवतांची पूजा करतो. सर्वांना वाटते की त्यांनी देवतांना प्रसन्न करावे त्यांच्या कडून सुखी जीवन जगण्यासाठी आशीर्वाद मिळवावे. पण अतिक्षय कमी लोक योग्य पद्धतीने देवतांची पूजा करतात. जे लोक योग्य पद्धतीने पूजा करतात त्यांच्यावर देवीदेवता नेहमी प्रसन्न राहतात. चुकीच्या पद्धतीने देवीदेवतांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते.

आज ही जिवंत आहेत महाबली हनुमान

हिंदू धर्मात तसे तर प्रत्येक देवीदेवतेला खास स्थान आहे. पण कलयुगात हनुमानाची पूजा सर्वात जास्त केली जाते. माहितीच्या नुसार हनुमानाला लोक कलयुगात सर्वात जास्त लवकर भक्तांच्या मदतीला धावून येणारा देव मानतात. एका कथेच्या अनुसार माता सीतेने हनुमानाला अमरतेचे वरदान दिले होते, त्यामुळे आजही हनुमान जिवंत आहेत. वेळोवेळी हनुमान जिवंत असल्याचे प्रमाण मिळाले आहेत. परंतु हे किती खरे आहे याबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.

हनुमानाच्या भक्तांना घाबरण्याचे कारण नाही शानिदेवांना

जर हनुमानाची पूजा योग्य पद्धतीने केली गेली तर त्यांना सर्वात जास्त लवकर प्रसन्न केले जाऊ शकते. एकदा जर हनुमान प्रसन्न झाले तर व्यक्तीवर त्यांची कृपा दृष्टी नेहमी राहते. ज्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात कधीही कोणतीही समस्या राहत नाही. त्यांच्या आशीर्वादाने घरामध्ये नेहमी सुख-समृद्धी राहते. जे लोक हनुमानाचे भक्त असतात त्यांना शनिदेवाला घाबरण्याचे कारण नाही. अश्या लोकांचे शनीदेव कोणतेही अनिष्ट करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला हनुमानाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सोप्पे उपाय सांगत आहोत.

प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय

  • सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कोणत्याही जवळच्या हनुमान मंदिरात जावे. मंदिरात हनुमानाला पंचोपचाराने पूजा करावी. हनुमानाला अक्षता वाहाव्यात आणि धूप-दीप दाखवून पूजा करावी.
  • हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी चमेली च्या तेला सोबत शेंदूर चढवावे. याच सोबत हनुमानाला लाल चंदन, लाल फुल आणि लाल वस्त्र चढवावे.
  • प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोप्पा उपाय हा पण आहे की नियमित हनुमान चालीसा पठन करावे. याच सोबत श्रीराम नामाचा 108 वेळा जप करावा.
  • हनुमानाचा मंत्र  “ॐ रमदूताय नमः” चा 108 वेळा जप करावा. हनुमानाच्या या मंत्राचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळेचा वापर करावा.

  • हनुमानाला प्रसाद म्हणून गुळ आणि चने अर्पित करावे. गव्हाचे पीठ आणि गुळ यांच्या पासून बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

  • पंचमुखी हनुमानाचे दर्शन घेतल्या नंतर त्यांना नारळ अर्पित करावे. त्यानंतर त्यांच्या चरणावर असलेल्या शेंदुराने आपल्या कपाळावर टिका लावावावा.
  • हनुमानाच्या समोर एक नारळ घेऊन आपल्या डोक्यावरुन सात वेळा उतरावा आणि तेथेच फोडावा, यानंतर आपल्या जीवनातील दुखः दूर करण्यासाठी हनुमानाकडे प्रार्थना करावी.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : मनोकामना पूर्ण करण्यासाठी करावे कोणते व्रत, नक्की वाचा


Show More

Related Articles

Back to top button