dharmik

माता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर लागोपाठ तीन शुक्रवार करा हे काम, होईल धनवर्षा

धनाची देवी माता लक्ष्मी आहे. असे मानले जाते कि माता लक्ष्मीच्या पूजेने दारिद्र्य दूर होते आणि सुख-सौभाग्य प्राप्ती होते. विशेषतः शुक्रवारी केलीली माता लक्ष्मीची पूजा विशेष फलदायी असते. शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी टिकून राहते. त्यामुळे जर तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली पाहिजे.

 

यासाठी शास्त्रा मध्ये काही विशेष विधी सांगितली आहे ज्यांचे पालन केल्याने माता लक्ष्मी सहज प्रसंन्न होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला त्या विधी बद्दल सांगत आहोत.

शुक्रवारी माता लक्ष्मीची अशी करा पूजा

शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान इत्यादी दैनिक कार्य झाल्यानंतर देवी लक्ष्मीची पूजा सुरु करावी. यासाठी घरातील पूजेच्या ठिकाणी माता लक्ष्मीचा फोटो समोर तुपाचा दिवा लावून बसावे आणि 108 वेळा लक्ष्मी मंत्र ॐ श्रीं श्रीये नम: जपावा. लक्षात ठेवा जप करताना तुमचे लक्ष पूजेच्या ठिकाणी केंद्रित असले पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मीला खडीसाखर आणि खीर यांचा नैवेद्य द्यावे. यानंतर सात वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलींना घरी बोलवून भोजन द्यावे. भोजनाच्या सोबत मुलींना माता लक्ष्मीला दाखवलेला खडीसाखर आणि खिरीचा प्रसाद द्यावा. याप्रकारे पूर्ण विधिवत माता लक्ष्मीची पूजा लागोपाठ तीन शुक्रवार करावी.

असे केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि त्यांच्या कृपेमुळे घरातील दारिद्य दूर होईल.


Tags
Show More

Related Articles

Back to top button