dharmik

स्त्रियांनी कोणत्या परिस्थिती मध्ये नाही केली पाहिजे महाबली हनुमानाची पूजा? जाणून घ्या

कलयुगा मध्ये महाबली हनुमान यांना चिरंजीव देवता मानले गेले आहे, असे मानले जाते कि ते वर्तमानात देखील धरतीवर आहेत आणि जे भक्त त्यांना आपल्या खरा भक्तिभावाने साद घालतो त्याच्या मदतीला ते आवश्य धावून येतात. महाबली हनुमान हे भगवान श्रीरामांचे परम भक्त आहेत आणि यांना संकट मोचन देखील बोलले जाते. हे आपल्या भक्तांचे सगळे संकटे दूर करतात. तसेच आपल्या भक्तांचे रक्षण देखील करतात. असे अनके भक्त आहे जे हनुमानाची मनोभावे भक्ती करतात. हे अत्यंत प्रेमभावाने हनुमानाची पूजा-अर्चना करतात. तसे पाहता हनुमानाच्या संबंधित अनेक मान्यता आहेत, एका मान्यते अनुसार असे सांगितले जाते कि स्त्रियांनी महाबली हनुमानाची पूजा नाही केली पाहिजे. महाबली हनुमानाची पूजा करण्यापासून स्त्रियांना मनाई केली गेली आहे पण त्यासाठी काही अतिरिक्त स्थिती सांगितल्या गेल्या आहेत ज्यांचे पालन करणे स्त्रियांसाठी आवश्यक मानले गेले आहे.

जसे कि आपण सगळे लोक जाणून आहोत कि महाबली हनुमान हे ब्रह्मचारी आहेत आणि ते महिलांना माता स्वरूप मानतात,त्यामुळे महाबली हनुमानास बिलकुल पसंत नाही कि स्त्री ने त्यांच्या चरणी आपले मस्तक झुकवावे, असे मानले जाते कि स्त्री ने महाबली हनुमानासाठी मोठे व्रत नाही केले पाहिजे, असे केल्यास महिला आपल्या घरगुती कर्तव्यास व्यवस्थित पूर्ण करू शकणार नाहीत, महिलांनी महाबली हनुमानास सिंदूर अर्पित नाही केले पाहिजे, त्याच सोबत बजरंग पाठ महिलांनी नाही केला पाहिजे. मासिक धर्म काळात पूजा पाठ नाही केला पाहिजे असे मानले जाते.

महिलांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि त्यांना हनुमानाची पूजा अर्चना करण्यास पूर्णतः मनाई नाही आहे, महाबली हनुमानाच्या आराधने संबंधित असे अनेक कार्य आहेत जे महिला करू शकतात. जर महिला हनुमानाच्या समोर दीप प्रज्वलित करते तर त्यास कोणत्याही प्रकारचा दोष मानला गेला नाही आहे. त्याच सोबत हनुमान चाळीस, संकट मोचन, हनुमानाष्टक, सुंदरकांड इत्यादीचे वाचन करू शकते आणि महिला आपल्या हातांनी बनवलेल्या प्रसादाचा नैवैद्य देऊ शकते.

वरील काही मान्यता आहेत ज्या स्त्रियांच्या हनुमान भक्ती संबंधात मानल्या जातात पण असे बिलकुल नाही कि महिला महाबली हनुमान ची पूजा करू शकत नाहीत पण असे करताना काही स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्यांचे पालन करणे स्त्रियांसाठी आवश्यक आहे. जर या गोष्टींचे पालन करून स्त्रिया महाबली हनुमानाची पूजा अर्चना करतात तर त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही व महाबली हनुमानाचे आशीर्वाद प्राप्त होतात.

Tags

Related Articles

Back to top button