money

जगातला पहिला पोर्टेबल सोलर AC, बिना विजेचा चालतो 8 तास

उन्हाळ्याचे दिवस आहेत. उष्णतेने सर्वांची अवस्था वाईट केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला एका अश्या AC बद्दल सांगत आहोत ज्याला तुम्ही तुमच्या सोबत कोठेही घेऊन जाऊ शकता. कारण हा एयर कंडीशनर पोर्टेबल आहे. याचे नाव Coolala आहे. यास Coolala या कंपनीने बनवले आहे. हा जगातला पहिला पोर्टेबल आणि सोलर पावर एयर कंडिशनर आहे जो उष्णते पासून सुटका मिळवण्यासाठी डिजाईन केला आहे. याची किमत 13500 रुपया पासून सुरु होते.

सोलर एनर्जीवर होतो चार्ज

यास चालवण्यासाठी विजेची आवश्यकता नाही आहे. हा सोलर एनर्जी वर चार्ज होतो. एकदा चार्ज झाल्यावर याची बैटरी 8 तास चालू शकते. हा 150 स्केवेअर फिट एरिया थंड करू शकतो. याची विशेषतः हि आहे की यामध्ये LED लाईट देखील आहे. घराच्या बाहेर अंधार झाल्यावर तुम्ही लाईट लावून तुमचे काम करू शकता. हा घराच्या आतमध्ये देखील प्लग इन केला जाऊ शकतो. यास आतमध्ये देखील युज करू शकता. या एसी सोबत सोलर पैनल, पावर बैंक, एक्जॉस्ट होस, एसी आणि डीसी एडॉप्टर मिळतो याची बुकिंग सुरु झाली आहे. हा जून पासून मिळण्यास सुरुवात होईल. यास kickstarter.com वरून ऑर्डर केले जाऊ शकते.

असा करू शकता वापर

घरा मध्ये युज करण्यासाठी यास कुलाला पावर एडोप्तर प्लग इन करावे आणि आउटडोर युजसाठी सोबत असलेला पावर स्टेशन वापरावा.

याचे वजन फक्त 3 किलो आहे. सोबतच यास व्हील लावलेले आहे त्यामुळे सहज एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाता येते.

6 वेगवेगळ्या वेरीएंट मध्ये उपलब्ध आहे. याचे बेसिक मॉडेल 13503 रुपयात उपलब्ध आहे. तर सर्वात महाग मॉडेल 30,874 रुपयाचे आहे.


Show More

Related Articles

Back to top button