People

महिला पाठवत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हजारो सेनेटरी नैपकीन, पहा याचे कारण

भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामाजिक मुद्द्यांच्या बाबतीत विशेष संवेदनशील आहेत. खासकरून महिलांच्या हक्क आणि कल्याणासाठी ते सतत प्रभावीपणे पाऊले उचलत आहेत. त्यामुळेच महिलांना देखील त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे आणि त्यांना विश्वास आहे की नरेंद्र मोदी हे आपल्या अपेक्षा पूर्ण करतील. त्यामुळे याच अपेक्षेने महिला हजारो सेनेटरी नैपकीन पंतप्रधान यांना पाठवण्यासाठी तयार केल्या आहेत.

खरेतर काही महिन्यापूर्वी जेव्हा जीएसटीमुळे महिला पीरिएड्सच्या दिवसात वापर असलेले सेनेटरी महाग झाले आहेत. त्यामुळे महिलांचा एक वर्ग मेसेज लिहून नैपकिन पंतप्रधानांना पाठवून विनंती करत आहेत की सेनेटरी नैपकीनला जीएसटी मधून वगळावे.

असे कदाचित पीएम मोदी वरील विश्वास आणि त्यांची सामाजिक मुद्दे आणि महिलांच्या हिता बद्दलची निष्ठा आहे की महिला त्यांना आपल्या हक्क आणि सन्मानाचे म्हणणे सांगण्यात कोणताही संकोच करत नाही आहेत. वर्तमान सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ सारख्या मोहिमेमुळे मुलींचे पालन पोषण करण्यासाठी पालकांमध्ये जागरुकता आली आहे, तर उज्वला योजनेमुळे गरीब महिलांना स्वयंपाक करण्यासाठी गैस उपलब्ध करून दिला. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तीन तलाक बद्दलचा निर्णय जो एक प्रकारे मुस्लिम महिलांवर अन्याय आहे त्यापासून मुक्ती मिळण्यासाठी कायदा करण्याची तयारी सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक वर्गातील महिला आपल्या हक्क आणि सम्मान मिळवण्यासाठी मोदी सरकारकडे आशेने पाहत आहे.

महिला आपले म्हणणे मांडण्यासाठी सक्षम आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून त्या जीएसटी मधून सेनेटरी नैपकीन वगळून कर मुक्त करावा अशी मागणी सरकारकडे करत आहेत. यासाठी मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथील महिलांनी एक अभियान सुरु केले आहे आणि ठरवले आहे की महिला आपल्या स्वाक्षरीचे एक हजार नैपकीन आणि पोस्टकार्ड पंतप्रधानांना पाठवतील.

अभियानाच्या सदस्य ग्वालियर निवासी प्रीती देवेंद्र जोशी या बद्दल सांगतात की, “सेनेटरी नैपकीन तर पहिल्या पासूनच अतिक्षय महाग आहे आणि महागाईच्या जमान्यात प्रत्येक महिला सहज पणे खरेदी करू शकत नव्हत्या..अश्यातच जीएसटी नंतर तर ते अजून जास्त महाग झाले आहे. ज्याचा परिणाम असा झाला आहे की आता सेनेटरी नैपकीनचा वापर मिडीयम वर्गाच्या महिला देखील करू शकत नाही आहेत, तर गरीब महिला याबद्दल विचार देखील करू शकत नाहीत.”

तर अभियानाची दुसरी सदस्य उषा धाकड सांगतात, “या अभियानात तरुणी आणि महिला कडून नैपकीनवर त्यांचे नाव आणि संदेश लिहून घेतला जात आहे. या अभियानाचा पहिला टप्पा 5 मार्च पर्यंत चालेल आणि त्यानंतर पोस्टकार्ड सोबत हस्ताक्षर युक्त एक हजार पैड पंतप्रधानांना पाठवून आम्ही आमच्या मागण्या सेनेटरी नैपकीन वर लागू 12 टक्के जीएसटी सहीत अन्य कर काढून घेण्याची मागणी करणार आहोत.”

या आंदोलनाच्या रूपरेषा नुसार 5 मार्चला 1 हजार नैपकीन पंतप्रधान मोदी यांना पोस्टकार्डसोबत पाठवण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 1 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 5 लाख नैपकीन पाठवले जातील. यासाठी हा देशव्यापी अभियान सुरु झाला आहे. या अभियानात मध्यप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राच्या सोबत अन्य राज्यातील महिला सहभागी होत आहेत आणि विशेष सहभाग यामध्ये नवतरुणीचा मिळत आहे.


Show More

Related Articles

Back to top button