Connect with us

वाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच

People

वाशिंग मशीन ड्रायर मध्ये बर्फ़ाचे तुकडे टाकून कपडे सुकवत होती महिला, कारण समजल्यावर तुम्ही देखील करायला लागाल असेच

आजकाल इंटरनेट ने जगावर राज्य केले आहे तर सोशल मीडिया ने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक व्यक्ती कोणत्याना कोणत्या सोशल नेटवर्किंग साईटवर असतोच.

यामध्ये काही गैर नाही सोशल मीडिया अभिव्यक्ती स्वतंत्र देते आपल्याला आपले विचार मांडण्याचे.

यावर लोक आपले म्हणणे त्वरित आणि निर्भीड पणे मांडतात.

सोशल मीडिया मध्ये एक गोष्ट सध्या वायरल होत आहे ती अशी कि एका महिलेने मागील दिवसात आपल्या शेजाऱ्या बद्दल एक प्रसंग सोशल मीडियावर शेयर केला आहे.

स्टैला नावाच्या महिलेने सांगितले आहे कि  तिची एक शेजारी एक दिवशी वॉश एरिया मध्ये वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुवत होती. त्यानंतर कपडे सुकवण्यासाठी तिने ड्रॅयर मध्ये कपड्या सोबत बर्फ़ाचे तीन तुकडे देखील टाकले.

शेजारी महिलेने असे का केले हे तिला समजले नाही. यानंतर ही महिला अनेक दिवस शेजारी महिलेला पाहत होती. पण त्यानंतर एक दिवस तिने विचारले आणि उत्तर ऐकल्या नंतर तिला विश्वास बसला नाही.

शेजारी महिलेने सांगितले कि आपण दररोज भरपूर कपडे धुतो. त्यानंतर त्यांना सुकवतो आणि त्यानंतर त्यांना इस्त्री करून कपाटा मध्ये ठेवतो. यामध्ये आपला बराचसा वेळ जातो.

पण या बर्फ़ाच्या तुकड्यांनी इस्त्री करण्याचा प्रॉब्लेम सोडवला आहे.

शेजारी महिलेने पुढे सांगितले कि कपडे धुतल्या नंतर वॉशिंग मशीनच्या ड्रायर मध्ये त्यांना सुकवल्यावर त्यांच्यावर सुरकुत्या राहतात.

त्यानंतर कपड्यांना इस्त्री करावी लागते. पण बर्फ़ाच्या मुले कपड्यावर सुरकुत्या पडत नाही आणि त्यांना इस्त्री करण्याची गरज पडत नाही.

शेजारी महिलेने सांगितलं कि कपडे सुकवताना ड्रायर मध्ये भरपूर बर्फ टाकला पाहिजे. जेव्हा ड्रायर मधून गरम हवा निघते तेव्हा बर्फ वेगाने विरघळतो.

पण बर्फ विरघळण्या सोबत तो वाफ देखील तयार करतो. वाफेमुळे कपड्यावरील सुरकुत्या ठीक होतात आणि कपडे सुकल्या नंतर बिना सुरकुत्यांचे बाहेर निघतात.

कपडे अश्या स्थितीत असतात कि त्यांना इस्त्री करण्याची गरज नसते.

Continue Reading
You may also like...
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Advertisement
To Top