inspiration

सुखी आणि यशस्वी जीवन मिळवण्यासाठी लक्षात ठेवा विलियम शेक्सपीयर यांची 10 वाक्य

जगप्रसिद्ध नाटककार, कवी, साहित्यिक विलियम शेक्सपीयर यांचा जन्म 26 एप्रिल 1564 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. शेक्सपीयर यांचा विवाह त्यांच्या 18 व्या वर्षी झालेला. जीवनाच्या बद्दल त्यांचा आपला एक वेगळा दृष्टिकोन होता. आजही त्यांचे विचार यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवतात. येथे आपण पाहू विलियम शेक्सपीयर यांनी सांगितलेल्या काही गोष्टी ज्यांच्यामुळे आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

1. ग्रहताऱ्यांमध्ये एवढी शक्ती नाहीकी ते आपल्या जीवनाचा निर्णय घेऊ शकतात, खरतर आपले भाग्य फक्त आपल्या हातामध्ये आहे.

2. नावामध्ये काय ठेवले आहे. जर आपण गुलाबास एखाद्या दुसऱ्या नावाने संबोधले तरी त्याचा सुगंध तसाच दरवळेल, जसा त्याचा सुगंध आहे.

3. आपल्यासाठी दुसऱ्या कडून मदतीची अपेक्षा करणे हेच सगळ्या समस्यांचे मूळ आहे.

4. रिकामे भांडे जास्त आवाज करतात म्हणजेच ज्यांच्या जवळ ज्ञान नाही आहे, ते जास्त आरडाओरडा करतात.

5. शेवट चांगला झाला तर समजवायचे सगळे चांगलेच आहे.

6. एक मूर्ख व्यक्ती स्वताला बुद्धिमान समजतो, परंतु एक बुद्धिमान व्यक्ती स्वताला मूर्ख समजतो. दोघांमध्ये हाच फरक आहे.

7. सगळ्यात जास्त आवश्यक आहे कि आपण स्वतः चांगले राहावे. आपण चांगले राहिले तर ही देखील समाजसेवाच आहे.

8. आपण जसे करू शकतो, तसेच बोलले पाहिजे आणि आपण जसे बोलतो, तसेच केले पाहिजे. आपल्या बोलण्यावर आपण कायम राहिले पाहिजे.

9. आपल्या जीवनामध्ये काहीही चांगले किंवा वाईट नाही होत, फक्त आपले विचार आपल्या जीवनाला चांगले किंवा वाईट बनवतात.

10. एक मिनिट उशिरा पोहचण्याच्या पेक्षा चांगले आहे कि आपण तीन तास अगोदरच पोहोचणे.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close