People

सूर्योदयापूर्वी का दिली जाते फाशीची सजा? हे आहे कारण

तुम्ही अनेक गंभीर आरोप सिद्ध झालेल्या अपराध्यांना फाशीची शिक्षा दिल्याचे बाताम्यामध्ये ऐकले असेल. तुम्हाला हे पण माहीत असेल की फाशीची शिक्षा सकाळी देतात. पण ही शिक्षा सकाळीच का देतात याचे उत्तर माहीत नसेल. या प्रश्नाचे उत्तर आज येथे देत आहोत.

नैतिक कारण

आपल्या समाजात असे मानतात की फाशीची शिक्षा ज्याला सुनावली गेली आहे त्याला पूर्ण दिवस वाट पाहावी लागू नये, यामुळे त्याच्या मानसिकतेला धक्का बसू शकतो. यासाठी सकाळी फाशीची शिक्षा दिली जाते.

सामाजिक कारण

अपराध्याला फाशीची शिक्षा ही आपल्या समाजासाठी एक मोठी आणि वाईट बातमी आहे. याचा समाजावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी सूर्योदय होण्यापूर्वी फाशी दिली जाते. सकाळच्या वेळी कैदी सुध्दा तणावमुक्त असतो.

प्रशासनिक कारणे

फाशीच्या पूर्वी आणि नंतर अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात त्यामध्ये मेडिकल टेस्ट, अनेक रजिस्टर मध्ये एंट्री आणि अनेक ठिकाणी नोट्स द्याव्या लागतात. यानंतर मृत शरीर कुटुंबियांच्या कडे सुपूर्द करायचे असते. कदाचित हे ही एक मोठे कारण आहे की सूर्योदय होण्या पूर्वी फाशी दिली जाते.


Show More

Related Articles

Back to top button