Connect with us

का केला तरुणीचा रेप? 100 रेपिस्ट ना विचारला प्रश्न, तर समोर आल्या काही सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर

People

का केला तरुणीचा रेप? 100 रेपिस्ट ना विचारला प्रश्न, तर समोर आल्या काही सुन्न करणाऱ्या गोष्टी समोर

हल्ली रेप आणि विनयभंग होण्याच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये नेता पासून ते अभिनेता आणि बिजनेसमैन पासून ते धर्मगुरू सर्वच रेप केल्याच्या आरोपा मध्ये जेल आणि कोर्टाच्या फेऱ्या मारताना पाहण्यास मिळत आहे.

रेप चे सर्वात भयानक रूप आपण दिल्ली मधील निर्भया रेप केस मध्ये पाहीले ज्यामध्ये मुलीला रेप नंतर रस्त्यावर मारण्यासाठी सोडून देण्यात आले. या घटने नंतर मिडिया आणि लोकांनी फार गोंधळ घातला आणि असे वाटायला लागले होते की आता काहीतरी सुधारणा पाहण्यास मिळेल. पण आज पाच वर्षा नंतर पण परिस्थिती जैसे थी आहे. आजही आपल्याला रोज याच बातम्या समजत असतात.

यांनी घेतला होता निर्भया च्या रेपिस्ट चा इंटरव्यू

एंजिलिया रस्किन यूनिवर्सिटी मध्ये क्रिमीनोलॉजी वर रिसर्च करणारी मधुमिता पांडे यांनी भारता मध्ये जवळपास 100 रेपिस्ट बरोबर भेट घेतली आणि त्यांना रेप करण्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला. मधुमिता ने सर्वात पहिले इंटरव्यू निर्भया कांडातील सर्वात मोठा गुन्हेगार मुकेश पांडे याचा घेतला. मधुमिता म्हणते आपल्याला वाटते की रेप करणारे लोक राक्षसा सारखे असतात. पण मधुमिता ने जवळपास 100 रेपिस्ट सोबत भेट घेतल्यावर म्हंटले आहे की ते राक्षस नसतात ते पण माणसच असतात. हा, पण जास्त करून ते अशिक्षित असतात. बाकी सर्व आपल्या आस-पास असलेल्या लोकांच्या सारखेच असतात.

विचारले का केला रेप, तर मिळाले हे उत्तर

मधुमिताच्या अनुसार या सर्व लोकांना भेटल्या नंतर रेप करण्याचे एकच कारण दिसून येते ते म्हणजे त्यांचे विचार आणि त्यांच्यावर झालेले संस्कार. रिसर्च मध्ये ही गोष्ट समोर आली की आपल्या समाजात स्त्रियांना नेहमी दडपणाखाली ठेवण्यात येते. आज ही बहुतेक घरांमध्ये हेच होते. यासर्वांमध्ये ही गोष्ट कॉमन होती की ते अश्याच घरातील होते. त्यांचे विचार आणि संस्कार असे आहेत की त्यांच्यासाठी असे करणे काही वेळासाठी चुकीचे वाटत नाही. तसेच मधुमिताच्या रिसर्च मध्ये ही गोष्ट पण स्पष्ट झाली की शिक्षणामुळे जास्त काही फरक पडत नाही. कारण त्यांच्या विचार आणि संस्कारांना याच्याशी काही देणेघेणे नसते. सुशिक्षित लोक सुध्दा अश्या प्रकारची कामे करतात.

गरज आहे विचार बदलण्याची

जर आपल्याला समाजात काही सुधारणा आणायची असेल तर यासाठी गरज आहे लोकांचे विचार बदलण्याची. रेपसाठी सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे त्यांचे विचार. त्यांचे विचार अजूनही जुन्या पद्धतीचे आहेत तेच त्यांची महिलेकडे पाहण्याची दृष्टी ठरवतात. माधुमिताने यासंबधीचा एक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले एक 23 वर्षाचा मुलगा जो मंदिरा मध्ये साफसफाईचे काम करत असे. त्याने साल 2010 मध्ये 5 वर्षाच्या मुलीचा रेप केला. त्याने याचे कारण सांगितले की 5 वर्षाची ती मुलगी त्याला चिडवत होती आणि तिला अद्दल घडवण्यासाठी त्याने तिचा रेप केला. मधुमिता ने केलेल्या रिसर्च मध्ये सर्वात मोठी गोष्ट हीच समोर आली की रेप करण्यामागे सर्वात मोठे कारण विचार पद्धती असते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top