Hair Carehealth

सफेद केस काळे करण्याचे सर्वात सोप्पे उपाय जे डाइ आणि हेयर कलर पासून सुटका देतील

आजकालच्या बदललेल्या लाइफस्टाइल मुळे आरोग्यावर आणि बॉडीवर याचे अनेक वाईट परिणाम होत आहेत. त्यामधीलच एक आहे अवेळी केस सफेद होणे. आजकाल तर लहान मुलांचे, नवतरुण तरुणी आणि कमी वयाच्या लोकांचे देखील केस सफेद झालेले आहेत. यामागचे कारण तुमचे खाणेपिणे असो किंवा लाइफस्टाइल पण ही एक मोठी समस्या आहे. जर तुम्ही देखील तुमचे केस सफेद होण्याच्या समस्ये मुळे वैतागले असाल तर घरी बसल्या कोणत्याही डाइ शिवाय किंवा केमिकल युक्त काळी मेहंदी शिवाय फक्त घरगुती वस्तूची मदत घेऊन तुम्ही तुमचे केस काळे करू शकता.

सफेद / पांढऱ्या केसांना काळे करण्याचे 6 घरगुती उपाय

खोबरेल तेल आणि लिंबू : जर तुमचे केस सफेद होत असतील तर खोबरेल तेला मध्ये काही थेंब लिंबू रस मिक्स करा आणि या तेलाने डोक्यावर मालिश करा. तुमचे केस काळे होतील आणि केसांवर चमक येईल.

खोबरेल तेल आणि आवळा : आवळ्याचे छोटेछोटे तुकडे करून यांना सावलीत सुकवा. त्यानंतर त्यांना खोबरेल तेला मध्ये हे सुकवलेले आवळे तळावे जोपर्यंत ते काळे आणि कडक होत नाही. हे तेल केस सफेद होण्या पासून थांबवण्यासाठी अतिशय उपयोगी आहेत. हा उपाय सोप्पा आणि अचूक आहे.

मध आणि अदरक : अदरक बारीक वाटून पेस्ट बनवा यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण दररोज लावल्यामुळे केस काळे होतात.

पेरूची पाने : पेरू चे काही पाने घेऊन ती बारीक वाटून पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट दररोज आपल्या स्कैल्प वर लावून मालिश करा. यामुळे तुम्हाला फायदा होईल.

देसी घी : आठवड्यात 2 वेळा शुध्द देसी घी ने स्कैल्पवर मालिश करा. यामुळे तुमचे केस काळे आणि घनदाट होतील.

कांद्याचा रस : कांद्याचा रस केस काळे करण्यासाठी रामबाण आहे. जर तुम्ही देखील केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रासलेले असाल तर आज पासूनच कांद्याचा रस तुमच्या केसांना लावण्यास सुरुवात करा.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : या बिया देतील टक्कल असलेल्यांना कंगवा करण्याची संधी आणि दीर्घकाळ काळे, घनदाट केस देऊ शकतात


Show More

Related Articles

Back to top button