astrologymoney

तुम्ही कधी श्रीमंत होणार का नाही, या पद्धतीने समजू शकते

ज्योतिष शास्त्राची मान्यता आहे की कुंडली मध्ये काही विशेष योग असतात ज्यांच्या प्रभावामुळे कोणताही व्यक्ती श्रीमंत बनतो. येथे काही असे योग सांगितले गेले आहेत ज्यामुळे व्यक्ती श्रीमंत बनू शकतो. चला तर पाहू या बद्दल अधिक माहीती काय आहे ते.

हे आहेत धनवान बनवणारे कुंडलीतील योग

जन्म कुंडली मधील दुसरे घर किंवा भाव धन दर्शवते. किंडलीमधील दुसरा भाव धन, खजाना, सोने, मोती, हिरे, चांदी इत्यादी संबंधी आहे. सोबतच व्यक्तीकडे किती स्थायी संपत्ती म्हणजेच घर, जमीन हे दुसऱ्या भावातून समजते.

ज्याव्यक्तीच्या दुसऱ्या भावात शुभ ग्रह असतील किंवा दृष्टी असेल त्यांना धनप्राप्ती होते.

जर व्यक्तीच्या दुसऱ्या भावात बुध ग्रह असेल आणि त्यावर चंद्राची दृष्टी असेल तर व्यक्ती कठोर मेहनत केल्या नंतर सुध्दा सहजपणे श्रीमंत होऊ शकत नाही.

जर व्यक्तीच्या द्वितीय भावात चंद्र असेल तर तो धनवान होतो.

जर द्वितीय भावाच्या चंद्रावर नीचेच्या बुधाची दृष्टी असेल तर व्यक्तीच्या परिवाराचे धन नष्ट होते.

जर चंद्र एकटा असेल आणि कोणताही ग्रह त्यास द्वितीय किंवा द्वादश नसेल तर व्यक्ती आजीवन गरीबच राहण्याची शक्यता असते. अश्या व्यक्तीला आजीवन अत्यंत परिश्रम करावे लागतात, पण तो जास्त पैसे प्राप्त करू शकत नाही.

जर द्वितीय भावा मध्ये पाप ग्रहाची दृष्टी असेल तर व्यक्ती धनहीन होतो.

जर सूर्य आणि बुध द्वितीय भावात असतील तर अश्या व्यक्तीकडे पैसे टिकत नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button