Connect with us

आता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार…

People

आता व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार…

व्हॉट्सअॅप हे आपल्या सर्वात आवडीचे मेसेजिंग अॅप आहे. याचे नित्यनवे व्हर्जन्स सातत्याने अपडेट होत असतात. व्हॉट्सअॅप ग्रुपचे तर खूळ खूपच आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अडमिनला भरपूर अधिकार होते. त्यांचे ग्रुपवर जास्त नियंत्रण होते. ते लोकांना ग्रुपमध्ये अॅड करु शकत असत. रिमूव्ह करु शकतात. पण ग्रुपचे नाव, आयकॉन बदलण्यावर अॅडमिनचे नियंत्रण नसायचे. ग्रुपचा कोणताही मेंबर ते करु शकत होता. त्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागायचे.

ग्रुप अॅडमिनला मिळणार जास्त अधिकार

आता अॅडमिनच्या अधिकारात चेंज होणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या नव्या 2.18.132 व्हर्जनमध्ये हे बदल दिसून येणार आहेत. अॅडमिनला आता नवीन ग्रुप सेटिंग ऑप्शन्स ग्रुप इंफो पेजवर दिसतील. त्यावर टॅप केल्यावर नवीन पेज ओपन होईल. त्यात editing the group’s info आणि change the group’s admins असा ऑप्शन दिसेल. त्यात all participants आणि only admin असे पर्याय दिसतील.

यासाठी डाऊनलोड करा हे व्हर्जन

जर तुम्ही ग्रुप अॅडमिन असाल आणि हे फिचर्स तुम्हाला टेस्ट करायचे असतील तर व्हॉट्सअॅपचे 2.18.132 हे व्हर्जन डाऊनलोड करा.

या आर्टिकलला जास्तीत जास्त शेयर करा ज्यामुळे तुमच्या इतर मित्रांना देखील या बद्दल माहिती मिळू शकेल.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top