धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे अशुभ असते, जाणून घ्या काय खरेदी करू शकता आणि काय नाही

हिंदू धर्मियांचा सगळ्यात मोठा सण दिवाळी अगदी काही दिवसांवर आलेला आहे. लोक आता पासूनच यांच्या तयारीला लागले आहेत. घराची साफसफाई पासून ते शॉपिंग सगळं प्लानिंग सुरु आहे. दिवाळी मध्ये लक्ष्मीपूजनाचे जेवढे महत्व आहे तेवढेच धनतेरसच्या दिवसाला देखील आहे. धनतेरसच्या दिवशी लोक धन पूजा करतात. असे मानले जाते कि या दिवशी धनाची पूजा केल्याने बरकत राहते. त्याच सोबत आपल्या उत्पन्नात देखील वाढ होते.

धनतेरसच्या दिवशी घरा मध्ये काही नवीन सामान खरेदी करून आणण्याची परंपरा आहे. अनेक लोक या दिवशी काही ना काही खरेदी करतात. परंतु अनेक लोकांना हे माहीत नाही आहे कि आपण धनतेरसच्या दिवशी कोणते सामान किंवा वस्तू खरेदी करावी हे देखील महत्वाचे आहे. काही विशेष वस्तू धनतेरसच्या दिवशी खरेदी नाही केली पाहिजे. कारण हे आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी अशुभ होऊ शकते. या वस्तू आपण इतर दिवशी खरेदी करू शकता पण धनतेरसच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नये.

धनतेरसच्या दिवशी हे खरेदी करू नये

या यादी मध्ये सगळ्यात पहिले लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत. लोखंडाच्या किंवा लोखंड वापरलेल्या वस्तू खरेदी करणे टाळले पाहिजे. या दिवशी लोह खरेदी करून घरा मध्ये घेऊन येणे अशुभ मानले जाते. त्यामुळे जर आपण काही नवीन वस्तू घेत असाल आणि त्यामध्ये लोह म्हणजेच लोखंड वापरले असेल तर कृपया धनतेरसच्या दिवशी त्यास खरेदी करू नये. तुम्हाला वाटल्यास त्यास आपण एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतर खरेदी करू शकता. या यादीत दुसरी वस्तू काळी किंवा काळ्या रंगाची छटा असलेले कपडे. धनतेरसच्या दिवशी या दोन्ही रंगाचे कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे टाळले पाहिजे. या रंगाला नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते.

धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करा

धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करू नये हे आपण पाहिले पण काय खरेदी केले पाहिजे हे जाणून घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. जर आपण या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केले तर हे आपल्यासाठी अत्यंत शुभ होऊ शकते. याच सोबत तांबे, पितळ यापासून बनलेल्या पूजेच्या वस्तू खरेदी करू शकता. तसे आपल्याला वाटल्यास आपण चांदी पासून बनलेल्या माता लक्ष्मीची मूर्ती किंवा सिक्का देखील खरेदी करू शकता. जर आपले बजेट कमी असेल तर आपण स्टील किंवा एल्युमिनियमची भांडी खरेदी करू शकता. तसेच आपण कपडे किंवा सजावटीचे सामान देखील खरेदी करू शकता. पण जसे आपण वर वाचले असेल त्याप्रमाणे काळ्या रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या छटा असलेल्या वस्तू खरेदी करू नयेत.

आपल्याला वरील माहिती आवडली असेल अशी आशा आहे. ही माहिती आपण इतरांच्या सोबत शेयर करून त्यांना देखील कळवू शकता. अश्या प्रकारे आपल्या सोबतच लोक देखील धनतेरसच्या दिवशी चुकीच्या वस्तूची खरेदी करणार नाहीत.