People

विचित्र बॉलिंग एक्शन, जी पाहून बैट्समैन चक्रावून जातात

दोन्ही हाताने बॉलिंग करण्याचे टैलेंट असलेल्या अक्षय कर्णेवार ने ऑस्ट्रेलियाच्या बैट्समैन ना हैरान करून सोडले होते. विदर्भाचा चमकता खेळाडू अक्षय आणि ऑस्ट्रेलिया वनडे सिरीजच्या पहिले खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात एकमेकांच्या समोर आले होते.

तेव्हा अक्षयचे हे टैलेंट पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्कस स्टॉइनिश सरप्राईज झाला होता. चला पाहूयात अश्याच काही विचित्र आणि जगा वेगळ्या प्रतिभा असलेल्या बॉलरची माहीती.

पॉल एडम्स, साउथ आफ्रिका

साउथ आफ्रिकेच्या पॉल एडम्सची बॉलिंग एक्शन पण अशीच अनऑर्थोडोक्स होती.

पॉल बॉलिंग करताना डोके एकदम खाली करायचे. असे केल्यावर त्यांना स्टम्प आणि बैट्समैन दोन्ही दिसायचे नाही पण तरीही ते अचूक गोलंदाजी करायचे.

लसिथ मलिंगा, श्रीलंका

यांच्या बॉलिंग एक्शन ला स्लिंग असे म्हणतात. हे बॉलला डोक्यापासून फार दुरून एक्रोस करून फेकतात. म्हणजे त्यांचा हात अंपायरच्या चेस्टच्या समोर असतो.

बॉल आणि अंपायरच्या कपड्यांचा रंग सारखा असल्यामुळे बऱ्याच वेळा बैट्समैनला बॉल समजायला कठीण होते. मलिंगाला क्रिकेटच्या दुनियेत योर्करचा बादशाह बोलले जाते.

मुथैया मुरलीधरन, श्रीलंका

 

फिरकीचा जादुगार असे म्हंटले जाणाऱ्या मुरलीधरनची एक्शन राईट आर्म ऑफब्रेक होती. त्यांचा रनअप छोटा होता आणि ते बॉल हातामध्ये लपवून बॉल फेकत असत.

त्यामुळे बैट्समैनला समजत नसे की ते फ्लैट बॉल टाकणार आहेत का दुसरा हे समजायचे नाही. टेस्ट मैचेस मध्ये 800 विकेट घेतल्यामुळे त्यांना किंग ऑफ स्पिन म्हटले जायचे.

सोहेल तनवीर, पाकिस्तान

सोहेल सरळ पळून क्रीजच्या कोपऱ्यातून बॉल करतात. त्यामुळे बॉल सरळ येण्या एवजी क्रॉस येते. त्यामुळे बैट्समैनच्या विचाराच्या विरुध्द बॉल सरळ स्टम्प मध्ये घुसते.

यांना रॉन्ग फुटेड बॉलर म्हंटले जाते. यांची बॉलिंग एक्शन अनऑर्थोडोक्स आहे.

अजंता मेंडिस, श्रीलंका

ऑफ ब्रेक-लेग ब्रेक बॉलिंग एक्शन करणारे मेंडिस बॉलला मिडल फिंगर ने स्ट्राइक करून फेकत होते, जसे काय कैरम खेळत आहेत.

बॉल स्लो फेकल्यावर पण बॉल पडून अतिशय वेगाने आत येत असे. त्यांना क्रिकेट जगात मिस्ट्री बॉलर बोलले जाते.

कॉलिन क्रॉफ्ट, वेस्ट इंडीज

70-80 च्या दशकातील या वेस्ट इंडियन बॉलरची एक्शन फास्ट बॉलर असून सुध्दा स्पिनर सारखी होती. त्यांचे बॉल एंगल बनवून क्रॉस जात असे.

बैट्समैनला जेव्हा वाटायचे की बॉल बाहेर जाईल, तेव्हा बॉल अवश्य स्टम्पवर जायचा. ते हाफ ऑर्थोडॉक्स बॉलिंग एक्शन ने बॉलिंग करायचे.


Show More

Related Articles

Back to top button