Connect with us

आवश्यकते पेक्षा जास्त सडपातळ असाल तर नक्की करा हे उपाय

Health

आवश्यकते पेक्षा जास्त सडपातळ असाल तर नक्की करा हे उपाय

जगातील बहुतांश लोक हे वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त आहेत, पण असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमी वजनामुळे म्हणजेच सडपातळ असण्यामुळे चिंतेत आहेत. अश्यात लोक अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतात. पण परिणाम शून्य होतो. अर्थ सरळ आहे वजन कमी असणे आणि जास्त असणे दोन्ही आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे प्रश्न हा येतो की स्वताला फिट कसे ठेवावे.  चला तर आज असे काही उपाय पाहू ज्यामुळे जर तुम्ही सडपातळ असाल तर स्वताला मैंटेन करू शकाल.

संतुलित आहार न घेतल्यामुळे बॉडी मध्ये वेगवेगळ्या समस्या दिसून येतात, त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला आपल्या डाइट मध्ये सुधार करावा लागेल. महिलांमध्ये ही एक सामान्य समस्या आहे की एकतर त्यांचे वजन जास्त होते किंवा एकदम कमी होते या दोन्ही स्थिती त्यांच्यासाठी चांगल्या नाहीत. वजन वाढवणे हे थोडे कठीण काम होते. वजन न वाढ हार्मोनची समस्या निर्माण करू शकतो.

सडपातळ मुलींसाठी उपाय

हार्मोनची तपासणी करा

वजन न वाढणे हे हार्मोनच्या समस्येमुळे असू शकते. यासाठी सर्वात पहिले आपल्या डॉक्टर कडून हार्मोनची तपासणी करून घ्या. थायराइड मुळे महिलांमध्ये सामान्य पेक्षा कमी वजनाची समस्या दिसून येते. यासाठी डॉक्टर कडून तपासणी करून घ्यावी आणि ट्रीटमेंट सुरु करावी.

वजन वाढवण्यासाठी प्लान बनवा

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर यासाठी चार्ट तयार करा. या चार्ट मध्ये त्यासर्व गोष्टी लिहा ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात खाणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. सोबतच तुम्हाला एक रुटीन फिक्स करावे लागेल, ज्यामुळे तुम्ही स्वताला निरोगी ठेवू शकाल.

जास्तीत जास्त अन्न सेवन करा

वजन वाढवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त खाल्ले पाहिजे. यासाठी तुम्हाला यागोष्टीची माहित असणे आवश्यक आहे कि तुम्हाला काय काय खाणे आवश्यक आहे. महिलांना कैलोरीची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे तुम्हाला अश्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे, ज्यामध्ये जास्त प्रोटीन असेल.

पिज्जा आणि बर्गरला करा गुडबाय

जर तुम्ही पिज्जा आणि बर्गर खाण्याचे शौकीन असाल तर त्यास गुडबाय करा. कारण यामुळे तुमचे वजन कधीही नाही वाढणार. त्या ऐवजी गव्हाच्या पोळ्या, तूप इत्यादीचे सेवन केले पाहिजे. सोबतच पौष्टिक आहार शामिल करावा.

व्यायाम करा

फिट राहण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. मुलींनी आणि महिलांनी व्यायाम आवश्य केला पाहिजे. व्यायाम केल्यामुळे शरीर फिट राहते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top