health

शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्याचे मिळतात हे 3 संकेत, जाणून घ्या नाहीतर करावा लागतो पश्चाताप

व्यक्तीने दररोज आठ ते दहा ग्लास पाणी सेवन केले पाहिजे. पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवश्यक प्रमाणात पाणी पिण्यामुळे अर्धे रोग दूर होतात. पाणी पिण्यामुळे त्वचा चमकते आणि चेहऱ्यावर दाग आणि मुरुमे देखील येत नाहीत. सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याचे फायदे तर सगळ्यांनाच माहित आहेत. पण तुम्हाला माहित आहे का रात्री झोपताना गरम पाणी पिणे अजून जास्त फायदेशीर आहे. डॉक्टरांच्या अनुसार रोज रात्री झोपण्याच्या 15 मिनिट अगोदर 1 ग्लास गरम पाणी पिऊन झोपले पाहिजे. असे केल्यामुळे बॉडीवर याचे अनेक फायदे. यामुळे तुमचे टेन्शन दूर होते, बॉडी क्लीन होते, बॉडी पेन दूर होते आणि सर्दी खोकला दूर होतो.

शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यामुळे अनके प्रकारचे रोग होतात. शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यावर डीहाइड्रेशन आणि मुतखडा सारख्या समस्या होऊ शकतात. बॉडी मध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर त्याचे काही संकेत बॉडी आपल्याला देत असते. हे संकेत जर तुम्ही वेळीच ओळखले तर पुढील प्रोब्लेम पासून वाचता येते. चला पाहू कोणते संकेत मिळतात शरीरा मध्ये पाणी कमी झाल्यावर.

शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यावर मिळतात हे संकेत

शरीरामध्ये पाण्याची कमी झाल्यावर त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसायला लागते. त्वचेतील ओलावा कमी झाल्यावर लहानसी इजा देखील दागामध्ये रुपांतरीत होते.

पाण्याची कमी झाल्यावर तोंडामधून दुर्गंधी येऊ लागते. हि दुर्गंधी ब्रश केल्या नंतर देखील दूर होत नाही.

डोकेदुखी होण्याचे एक कारण शरीरा मध्ये पाण्याची कमी देखील असू शकते. शरीरा मध्ये पाणी कमी झाल्यावर बहुतेक वेळा तीव्र डोकेदुखी होते. पण पाण्याची कमी दूर झाल्यावर ती त्वरित बरी होते. यासाठी दररोज भरपूर पाणी प्यावे.

पाणी पिण्यामुळे दूर होतात या समस्या

वजन कमी करण्यासाठी हलके कोमट पाणी मदत करते. यामध्ये थोडेसा लिंबूरस मिक्स केल्यास चांगला परिणाम दिसून येतो.

जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर एक ग्लास गरम पाणी प्यावे. बद्धकोष्ठता होण्याचे एक कारण शरीरा मध्ये पाण्याची कमी देखील असते. गरम पाणी पिण्यामुळे वेस्ट शरीराच्या बाहेर निघण्यास मदत होते.

जर तुम्हाला बॉडी पेन होत असेल तर सकाळी उठल्यावर गरम पाणी पिण्याची सवय लावा. पिरियड्सच्या वेळी गरम पाणी पिण्यामुळे फायदा मिळतो.

बॉडीमधून टॉक्सिन दूर करायचे असतील तर रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पूर्ण सिस्टम क्लीन करण्यास मदत करतो.

जो व्यक्ती सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास गरम पाणी सेवन करतो त्याचे पाचन तंत्र मजबूत राहते.

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीराचा रक्त प्रवाह चांगला राहतो.

Tags
Show More

Related Articles

3 Comments

  1. Lovely and quite informative article. Thanks for explaining benefits of water.

Back to top button
Close