inspiration

या मुलाने काय केले हे वाचल्यावर या जगात अजून इमानदार लोक शिल्लक आहेत यावर तुमचा विश्वास बसेल

एका सामान्य परिवारात जन्मलेल्या मुलाने अशी काही असामान्य इमानदारी दाखवली जी भल्याभल्यांना जमत नाही आणि कदाचित जमणारही नाही. यामुलाने जे केले त्यामुळे आपला सर्वांचा जो एकमेकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे तो थोडाफार वाढण्यास नक्की मदत होईल. या इमानदार मुलाचे नाव आहे विशाल उपाध्याय. विशाल एक सामान्य कुटुंबातील आहे त्याचे वडील चौकीदार आहेत. तो सध्या बारावीचा विद्यार्थी आहे. चला  तर पाहूयात या विशालने असे काय केले की आम्ही त्याचे एवढे कौतुक करत आहोत.

झाले असे की विशाल 15 ऑगस्ट 2017 च्या दिवशी नेहमी प्रमाणे डाइमंड स्ट्रीट महीधपुरा येथे क्रिकेट खेळत होता. क्रिकेटचा खेळ चांगलाच रंगला होता आणि विशाल ग्राउंडमध्ये फिल्डीग टीममध्ये फिल्डीग करत होता. त्यादरम्यान बॅट्समनने एक जोरदार शॉट मारला आणि बॉल ग्राउंडच्या बाहेरील सडकेच्या दुसऱ्या बाजूला गेला. विशाल बॉल आणण्यासाठी गेला तेव्हा त्याला रस्त्यावर एक बॅग सापडली त्याच वेळेस त्याने एक सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे ती बॅग पुन्हा त्या बॅगच्या मालकाला शोधून परत करण्याचा, कारण या बॅग मध्ये हिरे होते. विशालने ठरवले की हे हिरे परत त्याच्या मालकाला दिले पाहिजेत.

विशालने त्यादिवशी हिरे सांभाळून ठेवले कारण त्यादिवशी स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे दुकाने बंद होती. इकडे दुसरीकडे मनसुख सवालीया नावाच्या व्यक्तीचा जीव वरखाली होत होता कारण तो या हिऱ्यांचा खरा मालक होता आणि त्याच्या हातून बहुमुल्य हिरे हरवले होते. या हिऱ्यांची किंमत तब्बल 40 लाख रुपये होती. त्यामुळे मनसुख सर्व सीसीटीवी फुटेज चेक करत होता जेणेकरून हिऱ्यांचा काही शोध लागेल पण हाती निराशा आली.

विशाल ने हिरे असलेल्या बॅगची माहीती त्याच्या कुटुंबीयांना पण दिली नव्हती. त्याने ठरवले होते की दुकाने उघडल्या नंतर बॅग त्याच्या योग्य मालकास शोधून त्याला परत करण्याचे. तिसऱ्या दिवसी लोकांकडून त्याला समजले की मनसुख नावाच्या व्यापाराचे हिरे हरविले आहेत. तेव्हा विशालने हिरे मनसुख यांना परत केले.

हिरे व्यापारी मनसुख म्हणतात, “विशाल ने हिरे परत केले, त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. हिरे मिळाले नसते तर मला फार मोठे नुकसान झाले असते. घेणेकऱ्यांचे पैसे देण्यासाठी मला माझे घर सुध्दा विकावे लागले असते. विशालने मला आणि माझ्या परिवाराला वाचवले आहे.”

विशालच्या या इमानदारीसाठी त्याला 41,000/- रुपयाचे रोख बक्षीस देण्यात आले. 30 हजार रुपये मनसुख यांनी दिले आणि 11 हजार रुपये सुरत डाइमंड एसोसिएशनचे अध्यक्ष बाबू गुजराती यांनी दिले.

विशाल एक सामान्य परिवारातील आहे त्याचे वडील चौकीदार आहेत आणि त्यांना फक्त 8000 रुपये पगार आहे तर भाऊ ऑफिस मध्ये अकाउंटेंट आहे. विशालच्या कडून एकदा 50 रुपये हरवले होते त्यावेळेस त्याला पूर्ण दिवस जेवण गेले नव्हते आणि झोपही आली नव्हती त्याचा हा अनुभव असल्यामुळे त्याने कल्पना केली की ज्याव्यक्तीचे हिरे हरवले आहेत त्याची काय अवस्था झाली असेल.

विशालला जेव्हा विचारण्यात आले की तू बक्षीस म्हणून मिळालेल्या पैश्यांचे काय करणार आहेस तेव्हा त्याने ते पैसे तो शिक्षणासाठी वापरणार आहे असे सांगितले. तो पुढे म्हणाला की चांगले शिक्षण घेऊन भविष्यात तो आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

हल्लीच्या चोर आणि धोकेबाज झालेल्या दुनियेत विशाल सारखे व्यक्ती आशेचा किरण घेऊन येतात आणि एक आशा दाखवितात की जगामध्ये अजूनही इमानदारी शिल्लक आहे. विशाल सारखे लोक जगाला दाखवून देतात की या गोष्टीने फरक नाही पडत की तुम्ही कोणत्या पाश्वभूमीचे आहात तर फरक तुमच्या योग्य आणि अयोग्य ठरविण्याच्या निर्णयामुळे पडतो.

तुम्ही आपली प्रतिक्रिया खाली कमेंटस मध्ये देऊ शकता आणि पोस्ट लाईक करू शकता.. धन्यवाद


Show More

Related Articles

Back to top button