health

तुम्ही देखील आपले अंडर गारमेंट्स इतर कपड्यां सोबत धूत असाल तर सावध व्हा

आपल्या कपड्यांबद्दल बोलण्यास प्रत्येकाला आवडते पण जेव्हा गोष्ट अंडर गारमेंट्सची येते तेव्हा सगळेच संकोच करतात. अंडर गारमेंट्स म्हणजेच अंडरवियर आणि ब्रा हे लपलेले असतात आणि त्याची चर्चा आपण सगळ्यांच्या समोर करत नाही.

अंडर गारमेंट्स आपल्या शरीराला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करतात. आपल्याला या नाजूक आणि महत्वाच्या कपड्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. काळजी घेणे याचा अर्थ त्यांच्या स्वच्छतेची काळजी.

आपण कपडे धुतांना काही महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्या खरतर अत्यंत महत्वाच्या आहेत. काही लोक लांड्री बैग किंवा वाशिंग मशीन मध्ये सगळे कपडे पांढरे टी-शर्ट, मोजे, जैकेट आणि एवढेच नाहीतर अंडर गारमेंट्स देखील एकत्र करतात आणि कपडे धुतांना सगळे कपडे एकत्र धुतात. पण कपडे योग्य पद्धतीने धुण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कि सामान्य कपडे आणि अंडर गारमेंट्स यांना एकत्र धुतले नाही पाहिजे.

90 % महिला अंडर गारमेंट्स आणि सामान्य कपडे एकत्र धुतात

संशोधकांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना कळले कि 90 टक्के महिला आपले सामान्य कपडे आणि अंडर गारमेंट्स एकत्र धुतात. बहुतेक महिला आपला वेळ, पाणी आणि डिटर्जेंट वाचवण्यासाठी आपले अंडर गारमेंट्स इतर सामान्य कपड्यांच्या सोबत वॉशिंग मशीन मध्ये धुतात. पूर्णतः ओटोमेटीक वाशिंग मशीनमुळे आपले काम सोप्पे केले आहे. कपडे धुण्यासाठी महिला वाशिंग मशीन मध्ये डिटर्जेंट आणि पाणी टाकून आपले सगळे कपडे धुतात. असे करतांना आपण आपले अंडर गारमेंट्स देखील एकत्रच धुवून घेतो. पण असे करणे टाळले पाहिजे. त्यामागे काय कारणे आहेत ते आपण पुढे पाहू.

अंडर गारमेंट्स आणि सामान्य कपडे एकत्र का धुवू नयेत

अंडर गारमेंटस आपल्या शरीराच्या अश्या भागाच्या जवळ असतात जेथून आपण आपले मल-मुत्र त्याग करतो. त्यामुळे या कपड्यांमध्ये इन्फेक्शन इत्यादी असते ज्यामुळे दुसऱ्या कपड्या मध्ये देखील इन्फेक्शन बैक्तीरीया जातात.

बहुतेक वॉशिंग मशीन 15 डिग्री सेल्सीयस कपड्यांना धुते पण आपले अंडर गारमेंट्स मध्ये बैक्तीरीया असल्यामुळे त्यांना आवश्यक तापमान कमीतकमी 40 डिग्री सेल्सियस आवश्यक आहे. आपल्याला अंडर गारमेंट्स वेगळे गरम पाण्यात धुतले पाहिजेत ज्यामुळे संक्रमण होण्याचा धोका होत नाही.

लहान मुले आणि वृद्ध लोकांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असते आणि ते तरुणांच्या पेक्षा लवकर आजारी पडू शकतात. त्यांच्या कपड्यांना इतर सगळ्या कपड्या पेक्षा वेगळे धुतले पाहिजे. जर घरा मध्ये रुग्ण असेल किंवा अशक्त असेल तर त्याचे कपडे आणि अंडर गारमेंट्स वेगळे धुतले पाहिजेत ज्यामुळे एक दुसऱ्याच्या कपड्यांचे इन्फेक्शन पसरू शकणार नाही.


Tags
Show More

Related Articles

2 Comments

  1. छानच लिखाण
    उत्तम शास्त्रीय माहिती…

Back to top button