Breaking News
Home / राशिफल / घड्याळाने असे बदला घराचे आणि आपले नशीब

घड्याळाने असे बदला घराचे आणि आपले नशीब

तुम्ही अशी म्हण ऐकली असेलच कि, महागडा घड्याळ घातल्याने चांगली वेळ येत नाही, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे दिवस बदलत नाहीत. परंतु वास्तु विज्ञानात या बद्दलचा उल्लेख केलेला आहे की घड्याळ आपला वेळ बदलू शकतो, म्हणजे घड्याळामुळे आपले दिवस चांगले किंवा वाईट दोन्हीही होऊ शकतात.

तर घड्याळाकडे दुर्लक्ष करू नका आणि वास्तु विज्ञानाच्या या नियमांचे पालन करा, आपल्याला दिसून येईल की आपले चांगले दिवस स्वतःच येऊ लागले आहेत.

वास्तु विज्ञानामध्ये उत्तर व पूर्वेस वृद्धीची दिशा मानली गेली आहे. जर आपण आपल्या घरात भिंतीवरचे घड्याळ लावले असेल तर ते उत्तर किंवा पूर्वेकडील भिंतीवर लावले पाहिजे.

घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार कायम राहावा यासाठी भिंतीवर मधुर संगीत करणारे एक घड्याळ बसविली पाहिजे.

घड्याळ बंद पडणे वास्तू अनुसार शुभ मानले जात नाही, त्यामुळे व्यक्तीची प्रगती थांबते. जेव्हाही घड्याळ बंद पडेल ते त्वरित चालू केले पाहिजे. जर घड्याळ दुरुस्त होण्याच्या लायक नसेल तर ते त्वरित घराच्या बाहेर केले पाहिजे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit