बॉलीवूड मध्ये कॉम्पुटर ग्राफिक्सचा असा वापर केलेला हे माहीत नसेल तुम्हाला, कल्पना सत्यात अशी उतरवली गेली होती

असे मानले जाते कि डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवर ठेवला पाहिजे पण बॉलीवूड इंडस्ट्री मधील कॉम्पुटर ग्राफिक्सचा कसा वापर केला जातो हे तुम्हाला माहीत नसेल. जर हे समजलं तर तुम्हाला आपल्या डोळ्यांवर देखील विश्वास ठेवला पाहिजे का नाही अशी शंका येईल.

हॉलीवूड, बॉलीवूड आणि टॉलीवूड मध्ये अनेक वेळा स्क्रीनवर अश्या गोष्टी दाखवल्या जातात ज्या प्रत्येक्षात असतच नाहीत. कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि व्हीएफएक्स टेक्नॉलॉजी वापरून फिल्म मध्ये असं दाखवलं जात कि पाहणाऱ्याला ते प्रत्येक्षात असल्याचा भास होतो पण असं काही नसत ते काल्पनिकच असत. आज आपण येथे बॉलीवूड फिल्म मध्ये काही असे सीन्स बद्दल जाणून घेऊ जे प्रत्येक्षात काही वेगळेच होते पण त्यास भासवलं काही वेगळ्याच पद्धतीने.

फिल्म- बाहुबली: द बिगनिंग : 2015 साली रिलीज झालेली फिल्म फिल्म- बाहुबली: द बिगनिंग भारतीय फिल्म इंडस्ट्रीचा दृष्टिकोन बदलणारी फिल्म होती. या फिल्मच्या सुरुवातीला एक सीन होता ज्यामध्ये पाण्याच्या वर एक हात तरंगत असतो आणि त्या हातामध्ये एक नवजात बाळ असत. हा सीन पाहून लाखो प्रेक्षक हळवे झाले होते पण प्रत्येक्षात या सीन मध्ये एक पाण्याची बाटली हातात धरून हा सीन चित्रित केला गेला होता.

फिल्म- चेन्नई एक्सप्रेस : शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांची हिट फिल्म चेन्नई एक्सप्रेस मध्ये अत्यंत सुंदर लोकेशन्स दाखवले गेले होते आणि या फिल्म मधील अनेक सीन चालत्या ट्रेन मध्ये चित्रित केल्याचं दाखवलं होत. पण प्रत्येक्षात चेन्नई एक्सप्रेस मध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने क्रोमा वापरला गेला होता ज्यामुळे ट्रेन सुंदर लोकेशन्स मधून धावत असल्याचं वाटत होती.

फिल्म- एक था टाइगर : भरपूर एक्शन आणि स्टंट असलेल्या सलमान खान आणि कटरिना कैफच्या सुपरहिट फिल्म एक था टाइगर मध्ये देखील ग्राफिक्स वापरले गेले होते. फिल्म मध्ये सलमानच्या बॉडीवर जे एब्स दाखवले गेले होते ते ग्राफिक्स वापरून दाखवले गेले होते.

फिल्म- भाग मिल्खा भाग : फरहान अख्तर आणि सोनम कपूर स्टारर बॉलीवूड फिल्म भाग मिल्खा भाग पाहून प्रेक्षक खुश झाले होते. या फिल्म मध्ये देखील कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर अत्यंत सुंदर पणे केला गेला होता.

फिल्म- बाहुबली: द बिगनिंग : या फिल्म मध्ये असे अनेक सीन होते ज्यावर प्रेक्षकांनी खूप टाळ्या आणि शिट्ट्या मारल्या होत्या. फिल्म मध्ये भल्लालदेव रेड्या सोबत युद्ध करताना दाखवलं गेलं होत आणि हा सीन देखील कॉम्पुटर ग्राफिक्स ने बनवला गेला होता.

फिल्म – किक : सलमान खान ने फिल्म किक मध्ये ‘डेविल’ ची भूमिका करून सगळयांची मने जिंकली होती आणि फिल्म मध्ये स्टंट देखील केली होती. या फिल्म मध्ये एक सीन आहे जो लोकांना खूप आवडला होता ज्यामध्ये सलमान रेल्वे ट्रैक क्रॉस चालत्या सायकल वरून उतरून पायी चालत क्रॉस करतो. हा सीन देखील कॉम्प्युटर ग्राफिक्सचा वापर करून तयार केला होता.

फिल्म- रा.वन : शाहरुख खान ने या फिल्म मध्ये सुपरहिरोची भूमिका केली होती आणि फिल्म मध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्स मोठ्या प्रमाणात वापरली गेली होती. ही फिल्म फ्लॉप राहिली पण यातील अनेक सीन्स लोकांना आवडले होते.