People

500 रुपयाची नोट असली-नकली गोंधळाचे हायरल सत्य

तुम्हाला WhatsApp वर 500 रुपयाची असली नकली नोटे बद्दलचा मेसेज आलाच असेल. हा मेसेज हायरल झाला आहे आणि त्यामुळे 500 रुपयाच्या नोटे बद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. चला पाहुत काय सत्य आहे.

तुम्हाला एक मेसेज आणि वरील फोटो आला असेल त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की 500 रुपयाच्या नोटेवर असलेली हिरव्या रंगाची लाईन जीला सुरक्षा पट्टी म्हणतात ती जर गांधीजींच्या फोटो जवळ असेल तर ती नोट नकली आहे. पण जर ही सुरक्षा पट्टी गांधीजींच्या फोटो पासून लांब असेल आणि गव्हर्नरच्या सहीला छेद देत असेल तर ती खरी आहे. याच मेसेजचे सत्य जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या समोर पुढील माहीती आली.

वरील मेसेजचे सत्य तपासून पाहण्यासाठी जेव्हा RBI च्या वेबसाईटला भेट दिली तेव्हा तेथे पुढील माहीती समोर आली.

RBI च्या वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की 5 नंबरवर असलेली सिक्युरिटी लाईन तुम्हाला हिरव्या रंगाची दिसेल आणि जर नोट तिरकी केली तर निळ्या रंगाची दिसेल.  पण ही सुरक्षा लाइन कोठे असेल याबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच RBI च्या वेबसाईटवर असलेल्या नोटे मध्ये तर ही लाईन मधोमध आहे त्यामुळे WhatsApp वर आलेला मेसेज नकली आहे, खोटा आहे त्यामुळे तो मेसेज मनावर घेण्याची गरज नाही.


Show More

Related Articles

Back to top button