Breaking News

रणदीप हूडा चार वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्या नंतर आता तो गर्लफ्रेंड सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार?

रणदीप हुड्डा (Randeep Hooda) लवकरच त्याच्या गर्लफ्रेंडची भेट आपल्या आई-वडिलांच्या सोबत घडवून आणणार आहे. त्याने पहिलेच गर्लफ्रेंडला बहीण अंजली हुड्डा (Anjali Hudda) सोबत भेट करून दिली आहे.

बॉलिवूड (Bollywood) चा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हूडा आपल्या चाहत्यांना एक भन्नाट बातमी देऊ शकतो. इतकी प्रसिद्धी मिळूनही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. याचे एक कारण म्हणजे रणदीप हूडा आपले वैयक्तिक आयुष्य लोकांच्या पासून लपवून ठेवतो. तो कधीही त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत नाही. तो 4 वर्षांपासून कोणाशी तरी रिलेशनशिप मध्ये आहे हे त्याच्या चाहत्यांनाही माहिती नसेल. होय, हे अगदी काही लोकांना माहीत आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की रणदीप दीर्घ काळापासून मणिपुरी मॉडेल लिन लैशराम (Lin Laishram) ला डेट करत आहे.

randeep hooda bollywood actor
Randeep Hooda

खरं तर, 2018 मध्ये रणदीप हूडा (Randeep Hooda) आणि त्याची मैत्रीण नवी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियमवर (Tyagraj Stadium) एका सामन्यात एन्जॉय करताना दिसले. आपल्या माहितीसाठी, लिन लैशराम (Lin Laishram) ने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. 2014 साली त्याने ‘मेरीकोम’ (Marikom) मध्ये ‘बेम-बेम ‘ची भूमिका केली होती. या व्यतिरिक्त, लीन ही नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचा एक भाग आहे.

‘स्पॉटबॉय’ च्या वृत्तानुसार, रणदीप हूडा लवकरच आपल्या प्रेयसीला त्याच्या आई वडिलांसोबत भेटणार आहे. यापूर्वी त्याने लिनला आपली बहीण अंजली हूडा (Anjali Hooda) सोबतही भेट दिली होती. आता तो तिची ओळख आपल्या आई-वडिलांच्या सोबत करून देण्याची तयारी करत आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की लवकरच रणदीप त्याच्या चाहत्यांना काही चांगली बातमी देऊ शकतो.

त्याच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर तो ‘लव्ह आज कल’ चित्रपटात दिसला होता. यामध्ये रणदीप हूडाच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. तसेच, तो यावर्षी सलमानच्या ‘राधे’ चित्रपटातही दिसणार आहे. हा चित्रपट 22 मे 2020 रोजी प्रदर्शित होईल.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.