Connect with us

नीरव मोदीनंतर अजून एक उद्योजक 5 हजार कोटी घेऊन पळाला

Celebrities

नीरव मोदीनंतर अजून एक उद्योजक 5 हजार कोटी घेऊन पळाला

देशातील सामान्य लोक आणि शेतकरी हे बँकेचे कर्ज परत करू शकले नाहीत तर बँक कर्मचारी त्यांना एवढे त्रास देतात की शेवटी त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. पण दुसरीकडे मोठेमोठे उद्योजक हजारो करोड रुपयाचे कर्ज बुडवून पळून जात आहेत आणि वरून निर्लज्जपणे वर मान करून जगत आहेत याचे उत्तम उदाहरण विजय माल्या आणि ललित मोदी आहे. याच यादीमध्ये निरव मोदीचे नाव शामिल झाल्याची घटना ताजी असताना अजून एक उद्योजक देशातील 5 बँकेचे 5 हजार कोटी रुपये बुडवून परदेशी पळाल्याची शक्यता समोर आली आहे.

पेन बनवणारी रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व. त्याने देशातील ५ सरकारी बॅंकांमधून साधारण ५ हजार कोटी रुपयांचे कर्ज न चुकवता फरार झाल्याचा आरोप आहे.

कोण आहे विक्रम कोठारी ?

कोठारीचा संबंध ‘पान पराग’शी आहे. त्याचे वडील मनसुख भाई कोठारी गुजराती परिवाराशी संबंधित आहेत.

त्यांनी १९७३ मध्ये पान मसाल्याचा व्यवसाय सुरू करत पान पराग असे नाव दिले.

१९८३ ते १९८७ दरम्यान पान पराग ही जाहिरात करणारी सर्वात मोठी कंपनी.

कोणाकडून किती कर्ज ?

कोठारी कानपुरला राहत असून तिथेच घर आणि कार्यालय आहे. त्याने ५ सरकारी बॅंकामधून ५ हजार कोटी रुपये घेतले. २०१० पासून हे कर्ज घेण्यास सुरूवात झाली..

युनियन बॅंकेच्या स्थानिक मॅनेजरनुसार, कोठारीन ५ बॅंकांतून साधारण ३ हजार कोटींचे कर्ज घेतले. याचे कर्ज मिळून २०१८ पर्यंत व्याज मिळून ५ हजार कोटी रुपये झाले.

इंडियन ओवरसीस बॅंक : १४०० कोटी
बॅंक ऑफ इंडिया : १३९५ कोटी
बॅंक ऑफ बडोदा : ६०० कोटी
युनियन बॅंक : ४८५ कोटी
इलाहाबाद बॅंक : ३५२ कोटी

याव्यतिरिक्त कोठारीवर ६०० कोटी रुपयांचा चेक बाऊंस प्रकरणाचीही तक्रार आहे. यामध्ये पोलिस त्याची चौकशी करतेय.

कोठारी देशाबाहेर ?

कोठारी देशाबाहेर पळाल्याचे म्हटले जात आहे. कानपुर शहरात गेले वर्षभर तो दिसला नसल्याचे कानपुरमधील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान कोठारी देश सोडून गेला नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीयं.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top