health

महिलांनो केस गळतीमुळे वैतागल्या, तर आहारात या भाज्यांचा समावेश करा

साधारणपणे सर्व ऋतूमध्ये केसांची गळती होत असते. हल्ली सामान्य झालेल्या या समस्येमुळे अनेक स्त्रिया आणि पुरुष वैतागले आहेत. त्यामध्येच लोकांची बदललेली जीवनशैली धावपळीचे जीवन, अवेळी खाणे, जंक फूड, स्ट्रेस घेणे अशा अनेक कारणांमुळे केस गळती वाढू शकते. परंतु आहारामध्ये योग्य ते बदल केल्यास या समस्येवर परिणामकारक रित्या नियंत्रण मिळवता येऊ शकते. येथे सांगितलेल्या काही भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्यास केस गळती कमी होऊ शकते. केस हेल्दी होण्यासाठी मदत होऊ शकते. चला तर पाहूया अशा कोणत्या भाज्या आहेत ज्यांचा समावेश केल्याने केसांचे आरोग्य सुधारते.

कांदा

केस गळती थांबवण्यासाठी प्रभावी ठरतो.  कांदा केसांची गळती थांबवून पुन्हा केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. याशिवाय कांद्याचा रस काढून तो केसांच्या मुळांना लावल्यास केस मजबूत होतात.

गाजर

गाजरात भरपूर प्रमाणात बायोटिन असते. यामुळे केस गळती नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. कच्चे गाजर सेवन केल्यामुळे केस चमकदार होतात.

लसूण

तुम्हाला माहितच आहे की लसुन अनेक औषधी गुणांनी भरपूर आहे. यामध्ये antifungal गुणधर्म असतात. त्यामुळे केसांची गळती कमी होते. तसेच नियमित लसूण खाण्यामुळे केस चमकदार होतात.

कडीपत्ता

सामान्यपणे जवळपास सर्वच फोडणीमध्ये आपण कडीपत्ता वापरतो. कॅल्शियम आणि विटामिन्स भरपूर प्रमाणात कडीपत्ता मध्ये असते. यामुळे कडीपत्ता सेवन केल्यास केस मजबूत होतात.

काकडी

विटामिन सी मुबलक प्रमाणामध्ये काकडीमध्ये असते. त्यामुळे केसांची वाढ होते तसेच काकडीमध्ये एन्टीऑक्सिडेंट असतात. जे केसांना चमकदार बनवतात.

कोथिंबीर

केस गळती कमी करणे आणि केसांची लांबी वाढवण्यासाठी कोथंबीर मदत करते.

बटाटा

बटाट्यामध्ये स्टार्च असल्यामुळे केसांची चमक आणि केस वाढविण्यासाठी मदत होते. बटाट्याच्या आहारातील समावेशामुळे केसांची गळती कमी होते.

टोमॅटो

विटामिन सी आणि अँटिऑक्सिडेंटस मुबलक प्रमाणामध्ये टोमॅटोमध्ये असतात. यामुळे केसांची गळती कमी होण्यास भरपूर मदत होते.

बीट

हे किती पौष्टिक असते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. यामुळे केस मजबूत होतात दाट होतात काळी होतात.

मेथी

व्हिटॉमिन सी, प्रोटीन, पोटॅशियम आणि आयर्न मेथी मध्ये असतात. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मेथी मदत करते.


Show More

Related Articles

Back to top button