astrology

सकाळी सकाळी घराच्या प्रवेशद्वारावर करा हे काम, घरामध्ये नेहमी राहील बरकत

ज्या घरामध्ये आपण राहतो त्याची वास्तू आपल्यासाठी महत्वाची असते. विशेषतः मुख्य दरवाजा, कारण मुख्य दरवाजातूनच घरा मध्ये कोणतीही गोष्ट प्रवेश करते. येथूनच सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे जर मुख्य दरवाजाचे वास्तुशास्त्र बरोबर असेल तर बाहेरून येणारी नकारात्मक उर्जे पासून घर सुरक्षित राहते. पण जर घराच्या प्रवेश द्वारा मध्ये काही वास्तुदोष असल्यास नकारात्मक उर्जा आणि शक्तीना ते स्वता आकर्षित करतात. ज्यामुळे घरातील सुख-शांतीवर याचा विपरीत परिणाम होतो. यासाठी घराचा मुख्य दरवाजा दोष मुक्त असणे आवश्यक आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्र मध्ये मुख्य दरवाजाला दोष मुक्त करण्यासाठी आणि त्याची शुभतेसाठी अनेक उपाय आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच काही अत्यंत प्रभावी आणि सोप्पे उपाय सांगणार आहोत.

घराच्या मुख्य दरवाजावर सकाळी गंगाजल शिंपडावे, यामुळे घराची शुभता वाढते आणि तुमचे घर देवी लक्ष्मीच्या प्रवेशासाठी योग्य बनते. यासाठी हे कार्य सकाळी-सकाळी घरातील स्त्री म्हणजेच गृहलक्ष्मीने केले पाहिजे. यामुळे रात्री एकत्रित झालेली नकारात्मक उर्जा दूर होते. आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी मार्ग मोकळा होतो.

घराच्या प्रवेश द्वारावर स्वास्तिक बनवल्यामुळे सर्व प्रकारच्या वास्तुदोष नाश होतात. सोबतच जर घराच्या प्रवेश द्वारावर रांगोळी काढली तर यामुळे देवी लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि त्यांची कृपा घर-परिवारावर राहते ज्यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहते.

तसेच घराची शुभता वाढवण्यासाठी दररोज घरातील गृहलक्ष्मीच्या हातून मुख्यदरवाजावर मंगलकारी तोरण लावले गेले पाहिजे. हे तोरण अशोक किंवा आंब्याच्या पानांचे असावे. यामुळे घरामध्ये सुख-शांती आणि बरकत राहते. मान्यता आहे की ज्या घराच्या दरवाजावर तोरण बांधलेले असते तेथे देवी-देवतांचा आशीर्वाद राहतो. तर बेलपत्रांचे तोरण बांधल्यास कोणत्याही नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. यापद्धतीने तोरण मुख्यद्वाराची शोभा वाढवण्या सोबतच शुभता प्रदान करते.

मुख्य दरवाजा संबंधित काही वास्तू नियम

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा पूर्व आणि पश्चिम दिशेला असणे सर्वोत्तम मानले जाते. या दिशेला असलेला दरवाजा घरा मध्ये सुख-समृद्धी घेऊन येते.

घराचे दरवाजे नेहमी दोन फालक्याचे असावेत, कारण वास्तू अनुसार जर दोन फालक्याचे दरवाजे नसतील तर ते घर मालकासाठी अल्पायुचे कारण होऊ शकते.

सोबतच या गोष्टीकडे लक्ष ठेवावे की घराचा मुख्य दरवाजा तुटलेला किंवा सडलेला नसावा. खरतर घराचा मुख्य दरवाजा तुम्हाला सुख-समृद्धी आणि मान-सन्मान देतो त्यामुळे जर ते योग्य नसेल तर याच्या नकारात्मक प्रभावाने तुमच्या मान सन्मानात कमी येते.

तसेच घराचा मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतील बाजूस उघडणारा असावा, कारण घराचा दरवाजा बाहेर उघडणारा असल्यास तुम्हाला सतत अप्रिय आणि शोक समाचार ऐकण्यास मिळू शकतात.


Show More

Related Articles

Back to top button