Connect with us

झाडू संबंधित या गोष्टींकडे द्या लक्ष अन्यथा तुम्ही गरीब होऊ शकता

Dharmik

झाडू संबंधित या गोष्टींकडे द्या लक्ष अन्यथा तुम्ही गरीब होऊ शकता

झाडू आपल्या घराच्या साफसफाईचा महत्वाचा भाग आहे. जर घरामध्ये चांगली साफसफाई केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. साफसफाई बद्दल काही महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिले तर महालक्ष्मीची कृपा प्राप्त केली जाऊ शकते. शास्त्रानुसार झाडू म्हणजे महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. झाडूने दरिद्रता रुपी घाण घरा बाहेर जाते. ज्या घरामध्ये साफसफाई असते त्या घरामध्ये वातावरण सकारात्मक राहते आणि घराचे वास्तूदोष दूर होतात.

Vastu tips about jhadu and cleaning

ज्योतिषशास्त्रा मध्ये झाडू संबंधित काही छोटे-छोटे आणि सोप्पे उपाय आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या दूर होऊ शकतात.

घरामध्ये झाडू कोठे आणि कशी ठेवावी

झाडूमुळे घरात प्रवेश करणारी वाईट आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते. यासाठी झाडू संबंधित या गोष्टीकडे लक्ष द्या.

घरात उघड्या जागी झाडू ठेवणे अपशकून आणि सुख-समृद्धीसाठी हानिकारक मानली जाते. यासाठी झाडू नेहमी लपवून ठेवली पाहिजे.

झाडू कधीही स्वयपाकघरात ठेवू नका. यामुळे घरातील धान्य लवकर संपते आणि आरोग्याच्या संबंधित समस्या होतात.

शास्त्रानुसार घराच्या बाहेर रात्रीच्या वेळी दरवाजा समोर झाडू ठेवल्यामुळे नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाहीत. पण लक्षात ठेवा हे काम फक्त रात्रीच्या वेळीच केले पाहिजे. दिवसा झाडू लपवून ठेवली पाहिजे.

झाडू संबंधित शकून-अपशकून

असे मानले जाते कि जर एखादे लहान मुल घरामध्ये अचानक झाडू मारताना दिसला तर घरामध्ये पाहुणे येऊ शकतात.

कधीही सूर्यास्ताच्या नंतर घरात साफसफाई करू नये, हा अपशकून असतो.

झाडूवर चुकुनही पाय ठेवू नये, कारण असे झाल्यास लक्ष्मी क्रोधीत होते.

Continue Reading

Trending

Advertisement
To Top