dharmik

Vastu Shastra for Bathroom in Marathi : बाथरूमसाठी वास्तुशास्त्र टिप्स

Vastu shastra for bathroom in marathi : बाथरूम देखील घराचा एक महत्वाचा घटक आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये बाथरूम आणि वेगवेगळ्या रूमचे आप आपले वेगळे स्थान पक्के आहे. सध्या जागेची कमी असल्यामुळे रूम आणि बाथरूम सोबत असल्याची फैशन आली आहे. पण वास्तू अनुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचा घरातील प्रत्येक व्यक्तीवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असतो.

त्यामुळे हे महत्वाचे आहे कि वास्तु अनुसार बाथरूम आणि रूम असले पाहिजेत. कारण याचा प्रभाव घरातील सदस्यांवर आणि त्यांच्या आरोग्यावर होतो. याच सोबत याचे अनेक दुष्परिणाम देखील घराला झेलावी लागतात.कधीकधी आर्थिक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. घरातील आनंदावर देखील याचा प्रभाव पडतो. त्यामुळे हे आवश्यक आहे कि घरामध्ये बाथरूम कसे आहे याकडे लक्ष देणे.

Vastu Shastra for Bathroom in Marathi

चला तर पाहू बाथरूमसाठी काही विशेष वास्तु टिप्स

शौचालयचे सीट

नेहमी यागोष्टीची काळजी घ्या कि शौचालय चे सीट अश्या पद्धतीने असावे कि त्यावर बसल्यास तुमचे तोंड उत्तर किंवा दक्षिण दिशेला येईल.

एग्जास्ट फैन

जर तुम्ही नवीन घर बनवत असाल तर त्यामध्ये बाथरूम नक्कीच बनवत असाल. अश्यात बाथरूम मध्ये काही आवश्यक वस्तु तुम्ही नक्कीच लावाल यामध्ये एग्जास्ट फैन देखील शामिल आहे. जर तुम्ही देखील एग्जास्ट फाईन लावणार असाल तर त्यास उत्तर किंवा पूर्वेला लावण्याचे नक्की करा.

पाण्याचा प्रवाह

बाथरूम मधील पाण्याच्या प्रवाहासाठी उत्तर-पूर्व दिशा निश्चित करा.

गीजर

बाथरूम आणि शौचालय यांचा परस्पर संबंध असतो. त्यामुळे जर तुम्ही बाथरूम मध्ये गिजर लावणार असाल तर त्यास आग्नेय दिशेला लावा. कारण गिजरचा संबंध अग्नी सोबत आहे यासाठी आग्नेय कोपरा योग्य आहे.

उत्तर पश्चिम दिशेला असावे बाथरूम

घरामध्ये बाथरूम नेहमी उत्तर आणि पश्चिम दिशेला असावे. घरामध्ये या दिशेला बाथरूम असल्यास घरामध्ये धनाशी संबंधित कोणतीच समस्या निर्माण होत नाही. याच सोबत घरामध्ये कधीही नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही.

नळ आणि शॉवर

बाथरूम मध्ये नळ आणि शॉवर नेहमी उत्तर दिशेला असावे.

आरस्याचे तोंड दरवाजाकडे नसावे

तसे तर बाथरूम मध्ये आरसा लावला नाही पाहिजे. पण तरीही जर आरसा लावण्याचा विचार करत असाल तर त्याचे तोंड दरवाजाकडे ठेवू नका. असे केल्यास घरामध्ये नकारात्मक उर्जा येते. यामुळे घरामध्ये आरोग्य आणि धनाशी संबंधित समस्या येऊ शकतात.

बाथरूम मध्ये लावा क्रिस्टल बॉल

बाथरूम मध्ये विजेवर चालणारे सर्व संयंत्र दक्षिण-पूर्व भिंतीवर लावा. सोबतच बाथरूम मध्ये क्रिस्टल बॉल लावा. यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवेश होणार नाही.

बाथरूम मध्ये ठेवू नये रिकामी बादली

बहुतेक वेळा अंघोळ केल्यानंतर किंवा इतर कामे केल्यानंतर बादली रिकामी होते. पण कधीही बाथरूम मध्ये रिकामी बादली ठेवू नका. बादली मध्ये नेहमी पाणी भरून ठेवा. असे केल्यामुळे घरा मध्ये नेहमी आनंद टिकून राहील.

बाथरूम मध्ये मीठ ठेवा

बाथरूम मध्ये काचेच्या एका पारदर्शक भांड्यात मीठ ठेवा. वेळोवेळी हे मीठ बदलत राहा. यामुळे सर्व वास्तुदोष दूर होतात.


Tags
Show More

Related Articles

Back to top button