मनीप्लांट या 3 जागी लावणे असते सगळ्यात शुभ, घरा मध्ये होते बरकत च बरकत

मनीप्लांट एक असे रोपटे आहे जे जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसून येते. मनीप्लांट बद्दल बोलले जाते कि यास घरामध्ये लावल्याने पैश्यांची आवक वाढते आणि धनाची कधीही कमी होत नाही. असे असलं तरी लोक बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये घेऊन येतात ते फक्त हौस म्हणून. त्यामुळे अनेक लोकांना याचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही. याचे कारण हे आहे कि घरा मध्ये मनीप्लांट लावण्याचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा त्यास योग्य जागी लावले जाते. चुकीच्या जागी लावल्याने मनीप्लांटचे फायदे मिळू शकत नाहीत. त्यामुळे नेहमी यास वास्तु नियमांच्या अनुसार घरामध्ये लावले पाहिजे. आज या पोस्ट मध्ये आपण मनीप्लांट लावण्याची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात वाईट जागा कोणती या बद्दल जाणून घेऊ.

येथे मनीप्लांट लावणे असते शुभ

मनीप्लांट नेहमी घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात लावले पाहिजे. याजागी मनीप्लांट लावल्याने कुटुंबात पैश्याची आवक वाढते आणि सोबतच घरा मध्ये शांती राहते. याचे कारण हे आहे कि दक्षिण पूर्व कोपरा गणपतीचे प्रतीक मानले जाते. गणपती बाप्पा हे सुख, शांती आणि धन यांचे देवता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे याजागी मनीप्लांट लावणे अतिशय शुभ मानले जाते.

मनीप्लांट अश्या प्रकारे लावले पाहिजे कि त्याच्या वेलीच्या सगळ्या फांद्या वरच्या बाजूला चढतील. यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते. म्हणजेच घराच्या पिलर वर आपण मनीप्लांटची वेल वर चढवू शकता. वास्तु अनुसार घरामध्ये रिकामे पिलर (स्तंभ) सोडणे शुभ नसते. परंतु मोठा हॉल किंवा रूम बनवले जातात तेव्हा त्यामध्ये पिलर सोडावे लागतात अश्यावेळी यावर आपण मनीप्लांटच्या वेली चढवू शकता हे त्यांची निगेटिव्ह ऊर्जा समाप्त करून पॉजिटीव्ह एनर्जी पसरवतात.

कॉम्प्युटर टेबल किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तुंच्या जवळ मनीप्लांट ठेवण्याचे देखील फायदे असतात. असे बोलले जाते कि मनीप्लांट या इलेक्ट्रिक सामानातून निघणारे धोकादायक रेडिएशन कमी करण्याचे काम देखील करतात.

या जागी मनीप्लांट लावणे असते अशुभ

चुकूनही घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर पश्चिम कोपरा) मनीप्लांट नाही लावला पाहिजे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता येते. यामुळे घराची प्रगती थांबते आणि तिजोरी मध्ये ठेवलेले पैसे लवकरच संपतात.

मनीप्लांट असे लावू नका कि त्याच्या वेली खालच्या बाजूला वाढतील. मनीप्लांटच्या वेलीला खालच्या बाजूला लटकत ठेवले नाही पाहिजे. जर असे केले तर आपले पैसे लवकरच समाप्त होऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न हा करा कि वेल वरच्या बाजूला वाढतील.

काही लोकांना गैरसमज असतो कि मनीप्लांट चोरी करून आपल्या घरामध्ये लावल्यास भरपूर फायदा होतो. पण ही फक्त गैरसमजूत आहे. तर चोरी करून लावलेल्या मनीप्लांटमुळे कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे आपण यास दुसऱ्याच्या परवानगीने किंवा बाजारातून खरेदी करून आणावे.