astrology

घरामध्ये आठवड्याच्या या दिवशी लावा मनीप्लांट, नाही राहणार पैश्यांची कमी

पैसे एक अशी वस्तू आहे ज्याच्या मागे संपूर्ण जग लागले आहे. पैसे कितीही असलेले तर ते आपल्याकडे अजून जास्त असावेत असे प्रत्येकाला वाटते. पैसे जास्त मिळवण्यासाठी लोक दिवस रात्र मेहनत करतात. पण अनेक वेळा त्यांच्या मेहनतीला यश मिळत नाही ज्यामुळे ते निराश होतात. असे त्यांच्या वाईट नशिबामुळे होते. जेव्हा नशीब खराब असते तेव्हा एका मागून एक काम बिघडत जातात. पैश्यांच्या बाबतीत आपले नशीब सुधारण्यासाठी आणि चांगले करण्यासाठी तुम्ही वास्तूची मदत घेऊ शकता.

वास्तुशास्त्र भारता मध्ये प्रसिध्द आहे. आपण वास्तुशास्त्राचा अनेक वर्षांपासून वापर करत आहोत. एक चांगली वास्तू पॉजिटिव एनर्जी निर्माण करते. पॉजिटिव एनर्जी तुमच्या घरामध्ये सर्वकाही चांगले करू शकते. घरामध्ये मनीप्लांट लावल्यामुळे तुम्हाला याचा आर्थिक लाभ मिळू शकतो. मनीप्लांट घरा मध्ये लावणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रनुसार यामुळे घरात पैश्यांची आवक वाढते. सोबतच घरातील पैसे लवकर खर्च होत नाहीत.

तुमच्या पैकी अनेक लोकांनी आपल्या घरामध्ये मनीप्लांट लावले असेल. पण जर तरीही तुम्हाला यामुळे फायदा होत नसेल तर कदाचित मनीप्लांट लावताना तुमच्या कडून काही चुका झाल्या असतील. खरतर मनीप्लांट आठवड्याच्या कोणत्याही दिवशी लावायचे नसते. यामुळे आर्थिक लाभ मिळवायचा असेल तर यास आठवड्याच्या एका खास दिवशी लावले पाहिजे. चला आज आपण या बद्दल सविस्तर चर्चा करू.

घरा मध्ये या दिवशी मनीप्लांट लावणे शुभ

जर तुम्ही मनीप्लांट लावण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी शुक्रवार हा दिवस योग्य असतो. शुक्रवारच्या दिवसी मनीप्लांट लावल्यामुळे सर्वात जास्त फायदा होतो. खरतर शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि तुम्हाला माहित आहेच कि माता लक्ष्मी धनाची देवता मानली जाते. त्यामुळे माता लक्ष्मीचा दिवस म्हणजेच शुक्रवारी मनीप्लांट लावले तर यामुळे पैश्यांच्या दृष्टीने शुभ मानले जाते.

जर तुम्ही तुमच्या घरातील मनीप्लांट शुक्रवारी लावलेले नसेल तर तुम्ही एक नवीन मनीप्लांट शुक्रवारी लावू शकता. जर पूर्वी लावलेल्या मनीप्लांटची कुंडी मोठी असेल तर त्यामध्येच एक नवीन मनीप्लांट लावू शकता. फक्त हे काम तुम्हाला शुक्रवारी करायचे आहे एवढे लक्षात ठेवा.

या पद्धतीने लावा मनीप्लांट

जेव्हा तुम्ही घरामध्ये मनीप्लांट लावणार असाल त्यास पहिले माता लक्ष्मी समोर ठेवा आणि नंतर लक्ष्मीची पूजा आणि आरती करा. त्यानंतर या मनीप्लांटची देखील पूजा करा आणि नंतर यास कुंडीमध्ये लावा. या पद्धतीने लावला मनीप्लांट अधिक जास्त फायदा देतो.


Show More

Related Articles

Back to top button