Hair Carehealth

रात्री झोपण्याच्या अगोदर केसांना लावा वैसलीन सोबत या दोन वस्तू, परिणाम पाहून थक्क रहाल

सामान्य पणे लोक वैसलीनचा वापर हिवाळ्यात करतात जेव्हा आपली स्कीन कोरडी होते तेव्हा कारण स्कीनला सोफ्ट करण्यासाठी वैसलीन वापरतात हे सर्वांना माहीत आहे. पण येथे आम्ही वैसालीन आणि अजून दोन वस्तू केसांना लावण्याचे होणारे फायदे तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही विचार करत असाल की वैसालीन केसांना कसे काय लावले जाऊ शकते. पण आज येथे वैसलीन केसांना काय चमत्कारीक फायदे मिळवून देतात हे आपण पाहू.

धावपळीच्या आयुष्यात केसांची काळजी घेणे राहून जाते त्यामुळे केस कोरडे होणे त्यांना फाटे फुटणे, गळणे, तुटणे यासमस्या होतात पण आजचा हा उपाय तुम्हाला या समस्ये पासून मुक्ती देईल.

या कारणामुळे होते केसांची समस्या

केसांची समस्या होण्याचे सामान्य पणे पुढील कारणे असतात. यामध्ये चुकीचे खाणे पिणे, अनियमित लाइफस्टाइल आणि प्रदूषण ही कारणे आहेत. पण यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही आता वैसलीनचा वापर करू शकता.

केसांच्या आरोग्यासाठी कसा करावा वैसालीनचा वापर

वैसालीनचा वापर केसांवर केल्यामुळे केस मुलायम होतात आणि घनदाट, काळे देखील होतात. केसांवर वैसालीन लावण्याचे कारण म्हणजे केसांना फाटे फुटणे म्हणजेच त्यांना दोन भागात विभाजन होत असताना दिसणे याचे मुख्य कारण केस कोरडे होणे हे असते. त्यामुळे जर केसांना वैसालीन लावले तर केसांना आवश्यक ते पोषण मिळते आणि केस सोफ्ट आणि सिल्की होतात.

वैसालीन केसांना लावण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले एक वाटी मध्ये दोन चमचे नारळाचे तेल, अर्धा चमचा वैसलीन आणि एक विटामिन इ कैप्सूल कापून मिक्स करा. या तीन वस्तूंचे प्रमाण तुम्ही आपल्या केसांच्या लांबी नुसार वाढवू शकता. या तीनही वस्तू व्यवस्थित एकत्र कराव्या आणि झोपण्याच्या अगोदर केसांच्या मुळा पासून ते केसांच्या दुसऱ्या टोका पर्यंत व्यवस्थित लावावे.

हे मिश्रण केसांना रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी अंघोळ करताना केस धुवून घ्या. असे काही आठवडे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवण्यास सुरुवात होईल. सुंदर आणि लांब केसांच्यासाठी तुम्ही हा प्रयोग नक्की करून पहा. तुमचे केस नक्कीच सुंदर आणि आकर्षक होतील.


Show More

Related Articles

Back to top button