Life Style

99 टक्के लोकांना माहीत नाही एल्युमिनियम फॉयल चा वापर या कामांसाठी देखील करता येतो

बहुतेक सगळ्या घरांच्या किचन मध्ये एल्युमिनियम फॉयल चा रोल असतो. आपण सगळे अन्न गरम ठेवण्यासाठी याचा वापर करतो आणि अनेक वेळी ओव्हन मध्ये अन्न बेक करण्यासाठी याचा वापर केला जातो.

घरातील असे अनेक लहानमोठे कामे आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही एल्युमिनियम फॉयल वापरू शकता. आणि विश्वास ठेवा एल्युमिनियम फॉयल चा असा वापर समजल्यावर तुम्हाला याची जास्त मदत होईल.

घरामध्ये वापरली जाणारी कैची वेळेनुसार आपली धार गमावते आणि अनेक वेळा त्यावर गंज पण चढतो. जर तुम्ही देखील घरातच आपल्या कैची ची धार वाढवू इच्छिता तर त्यासाठी एल्युमिनियम फॉयल आठ ते दहा वेळा कापा.

एका भांड्यातून एखाद्या बाटली मध्ये तुम्ही काही वस्तू किंवा लिक्विड टाकू इच्छित असाल तर त्यासाठी तुम्ही एल्युमिनियम फॉयलची मदतीने कीप किंवा ट्यूब बनवू शकता. तुमचे सामान सांडणार नाही.

जर तुम्ही बाटली मध्ये एखादा द्रव पदार्थ टाकत असाल तर फॉयल ची ट्यूब बनवून त्याचा वापर करू शकता.

तुम्हाला इस्त्री करताना आपली मेहनत कमी करायची असेल तर त्यासाठी एल्युमिनियम फॉयल तुमच्या मदतीला येऊ शकते. ज्या कपड्याला इस्त्री करायची आहे त्याखाली अगोदर फॉयल ठेवा. जेव्हा तुम्ही इस्त्री कराल तेव्हा खाली ठेवलेली फॉयल जास्त गरम होईल आणि एकवेळीच दोन्ही बाजूने कपड्यांच्या सुरकुत्या निघून जातील.

वाचा : कपड्यांच्या व्यतिरिक्त या वस्तू देखील वॉशिंग मशीन मध्ये धुवू शकता तुम्ही

एल्युमिनियम फॉयल च्या मदतीने तुम्ही आपल्या इस्त्री ची प्लेट चमकावू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त फॉयल लपेटून बॉल बनवायचा आहे आणि नंतर त्याने इस्त्रीची प्लेट घासायची आहे.

फॉयल बैटरी (सेल) चे आयुष्य वाढवतो. जर घरातील टीव्ही च्या रिमोट किंवा दुसऱ्या वस्तूच्या बैटरी संपल्या आणि त्यावेळी तुमच्याकडे नवीन बैटरी नाही तर एल्युमिनियम फॉयल बैटरीच्या दोन्ही बाजूला लावून पुन्हा वापरू शकता.

घरात काही फर्निचर असे असतात ज्यांच्या खाली व्हील (चाक) नसतात. त्यामुळे त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागी सरकावण्यात त्रास होतो. अश्या वेळी फर्निचरच्या पायांच्या खाली फॉयल ठेवावे ज्यामुळे फर्निचर सहज सरकावता येतात.

तुम्हाला माहीत आहे का फॉयल वायफाई च्या सिग्नलला प्रभावित करू शकतो. फॉयल काही वेळा गुंडाळा आणि त्यास वायफाई च्या एंटीना च्या मागे भिंती प्रमाणे उभे करा.

एल्युमिनियम फॉयल कुकिंग करणाऱ्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. हे तुमच्या पदार्थाना जाळण्यापासून वाचवतो. जर तुम्हाला वाटते कि अन्न भांड्याच्या तळाला चिटकू नये तर पैन वर फॉयल पसरावा. असे करून तुम्ही विना तेल वापरता देखील पदार्थ बनवू शकता.

तुम्ही यांच्या मदतीने आपले दात चमकदार बनवू शकता. सगळ्यात अगोदर तुम्ही टूथपेस्ट मध्ये बेकिंग सोडा मिक्स करा. आता यास फॉयलच्या स्ट्रीप वर लावा आणि त्या स्ट्रीपला आपल्या दातांवर ठेवा. 1 तास यास लावून ठेवा आणि नंतर तोंड चांगले गुळणी करून स्वच्छ करा.

खिडकी किंवा दरवाजाला तुम्ही रंग देत असाल तर त्यांच्या हैंडल किंवा नॉब वर फॉयल लपेटा. पेंट चे काम झाल्यावर फॉयल हैंडल वरून काढा. असे केल्याने त्यावर पेंट बिलकुल लागणार नाही.


Show More
Back to top button