health

उंदरांनी घरामध्ये धुमाकूळ घातला आहे का? तर आजच त्यांना पळवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

बहुतेक वेळा असे पाहण्यात येते कि लोक आपल्या घरामध्ये उंदरा पासून हैराण असतात. उंदीर पळवण्यासाठी विविध औषधांचा आणि उपायांचा वापर करतात. अर्थातच उंदीर घरामध्ये भरपूर नुकसान करतात. याच सोबत यांच्या मलमुत्रामुळे अनेक आजार पसरतात. याचा अर्थ उंदीर जेथे जेथे जातात तेथे ते आजार पसरवतात. या सर्व कारणामुळे उंदरांना घरात थारा देता कामा नये. यांना मारण्यासाठी अनेक उपाय केले जातात पण उंदीर मारण्याच्या औषधामुळे इन्फेक्शन होण्याची भीती देखील असते. यासाठी नैसर्गिक उपाय वापरून उंदीर पळवणे फायद्याचे राहील.

उंदीर करतात नुकसान

उंदीर घरामध्ये ठेवलेल्या सामानाचे नुकसान करतात याच सोबत वास्तुशास्त्र मध्ये उंदीर नकारात्मक आणि अज्ञानी शक्तीचे प्रतिक मानले गेले आहे. असे मानले जाते कि उंदीर जर घरामध्ये असतील तर घरातील सदस्यांच्या बुद्धीचा विनाश होतो. बहुतेक वेळा पाहण्यात आले आहे कि उंदीर अस्वच्छ ठिकाणी राहतात. त्यामुळे उंदरांना घरातून बाहेर हाकलणे आवश्यक आहे. चला पाहू उंदरांना घरा बाहेर काढण्यासाठी कोणते नैसर्गिक उपाय केले जाऊ शकतात.

उंदीर पळवण्याचे उपाय

1. कांद्याचे तुकडे

उंदरांना कांद्याची दुर्गंधी आवडत नाही. त्यामुळे उंदीर पळवण्यासाठी कांद्याचे तुकडे त्याठिकाणी ठेवा जेथे उंदीर नेहमी दिसतात. यामुळे उंदीर तुमच्या घरातून अगदी सहज दूर होतील.

2. डोक्याचे केस

जर तुमच्या घरामध्ये उंदरांनी धुमाकूळ घातला असेल तर तुमच्या डोक्यावरचे केस वापरून तुम्ही त्यांना सहज पळवू शकता. कारण डोक्यावरच्या केसांना गिळल्यामुळे ते मरतात. त्यामुळे ते मानवी केसांच्या आसपास देखील येत नाहीत. त्यामुळे जर तुमचे केस गळत असतील तर ते केस उंदराच्या बिळाच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये जेथे उंदीर नेहमी दिसतात तेथे ठेवा.

3. लाल मिरची

लाल मिरची उंदरांना पळवण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. ज्या ठिकाणी उंदरांचे येणे जाणे आहे त्याठिकाणी लाल मिरची किंवा तिखट पसरावा. यानंतर उंदीर घरात येऊ शकणार नाही.

4. पिपरमेंट

पिपरमेंटचा सुगंध देखील उंदरांना त्रास देते. जर तुमच्या घरा मध्ये उंदीर असतील तर कापसावर पिपरमेंट लावून कोपऱ्यात ठेवा. यामुळे उंदीर तुमचे घर लवकरच सोडून पळून जातील.

5. गोबर (शेण)

गोबर देखील उंदरांना दूर ठेवू शकते. गोबर खाण्यामुळे उंदरांच्या पोटामध्ये संक्रमण होते ते मरतात.

6. पुदिन्याची पाने आणि फुल

उंदराच्या त्रासाने वैतागले असाल तर उंदरांच्या बिळा जवळ किंवा जेथे उंदीर नेहमी दिसतात तेथे पुदिन्याची पाने ठेवा. पुदिन्याची पाने देखील उंदरांना आवडत नाहीत.

7. घुबडाचे पंख

आपल्या घरामध्ये घुबडाचे पंख लावा. यामुळे उंदीर घाबरतील. आणि घरात पुन्हा दिसणार नाहीत.

Show More

Related Articles

Back to top button