Uncategorized

वजन कमी करण्यासाठी, वेट लॉस करण्यासाठी नैसर्गिक पदार्थाचे घरगुती उपाय

सामान्य रुपात शरीरात तयार होणाऱ्या चर्बी मुळे शरीराला रोगा सोबत प्रतिकार करण्याची ताकत मिळते पण जेव्हा आपल्या शरीरात चर्बी सामान्य प्रमाणा पेक्षा जास्त तयार होते तेव्हा आपले शरीर थुलथुले आणि जाड दिसायला लागते. अश्या प्रकारे जास्त चर्बी जमा झाल्यामुळे आपल्या शरीराची त्वचा वेगवेगळ्या भागात लटकताना दिसायला लागते आणि शरीर बिडौल होते. अश्या प्रकारे शरीरात अनावश्यक चर्बी जमा होण्याला वजन वाढणे किंवा जाड होणे असे बोलले जाते.

वजन वाढण्याचे आणि पोट सुटण्याचे कारण

वजन वाढण्या मागे अनेक कारणे असू शकतात, जसे जास्त प्रमाणात चिकाने पदार्थ (तूप, लोणी) खाणे, फैट वाले पदार्थ जास्त खाणे, दिवसभर काहीतरी खात राहणे, सारखे आराम करणे, काही काम न करणे, व्यायाम न करणे. काही लोकांमध्ये वजन वाढणे अनुवांशिक सुध्दा असते. अर्थात ज्यांचे आई-वडील जाड असतात त्यांची मुले देखील जाड होऊ शकतात. वजन वाढल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाचा रक्तदाब वाढतो. वजन वाढल्यामुळे त्वचा फुगते. जास्त चर्बी मुळे हृदयावर देखील प्रभाव पडतो ज्यामुळे हृदयाची गती कमी होते.

वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी किंवा चर्बी कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय

चर्बी कमी करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. एरोबिक्स यासाठी फायदेशीर होतो. आळशी जीवनपद्धती मुळे वजन वाढते. यासाठी सक्रीय रहा.

मध वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा पदार्थ आहे. एक चमचा मध अर्धा चमचा लिंबू रस गरम पाण्यात मिक्स करून घेण्यामुळे शरीराची अतिरिक्त चर्बी कमी होते. हे दिवसातून 3 वेळा घ्यावे.

कोबी (पत्ता कोबी) मध्ये चर्बी कमी करण्याचे गुण असतात. जास्त कैलरीचे दहन होते. या प्रक्रियेत चर्बी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत मिळते.

पुदिन्यामध्ये देखील वजन कमी करणारे तत्व असतात. पुदिना रस एक चमचा 2 चमचे मध मिक्स करून घेतल्याने फायदा होतो.

सकाळी झोपे मधून उठल्यावर 250 ग्राम टमाटर रस 2-3 महिने पिण्यामुळे weight loss होण्यास मदत होते.

गाजराचा रस वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर आहे. जवळपास 300 ग्राम गाजरचा रस दिवसातून एक वेळा घ्यावा.

एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की पाणी देखील वजन कमी करण्यास मदत करते. प्रत्येक तासाला 2 ग्लास पाणी प्यावे. या प्रकारे दिवसातून कमीत कमी 20 ग्लास पाणी प्यावे. यामुळे शरीराला नको असलेले पदार्थ शरीरा बाहेर निघून जातील आणि पचन शक्ती सुधारेल. ज्यामुळे जास्त कैलरीचे दहन होईल आणि चर्बी कमी होईल.

कमी कैलरी असलेल्या खाद्य पदार्थाची निवड करावी. जो पर्यंत तुम्ही कमी कैलरी असलेले पदार्थ खाण्याची सवय नाही घालून घेत तो पर्यंत वजन कमी होण्यास अडचण होते. असे भोजन करावे ज्यामध्ये कमी कैलरी असलेले पदार्थ खावे.

आपल्या भोजना मध्ये हे पदार्था समाविष्ट करा.

द्राक्षे, पेरू, सफरचंद, खरबूज, जांभूळ, आंबे, संत्रे, टमाटर, टरबुज, अननस, लिंबू, स्त्रोबेरी, भाज्या ज्यामध्ये कमी कैलरी असतील जसे कोबी, ब्रोकली, कांदे, मुळा, पालक, लसून, अद्रक इत्यादी.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : लिंबू आणि जीरा यांचे हे मिश्रण वाढलेल्या वजनासाठी काळ आहे. असा करा वापर

Related Articles

Back to top button