foodhealth

तुळस देवाला जेवढी प्रिय आहे त्याहून जास्त आपल्या शरीराला प्रिय आहे, कारण समजले तर आश्चर्य होईल

तुळस जेवढी देवाच्या पूजेसाठी महत्वाची आहे त्याहूनही थोडी जास्त आरोग्यासाठी महत्वाची आहे. आज आपण पाहू तुळस कोणत्या शारीरिक समस्येत कोणते फायदे.

आपल्या संस्कृतीत तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस पवित्र असल्याने प्रत्येकाच्या अंगणात स्थान मिळाले आहे. या पौराणिक महत्त्वाबरोबर याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. तुळशीच्या नियमित सेवनाने अनेक आजार, विकारांपासून सुटका मिळण्यास मदत होते. तुम्हाला माहित आहेत का तुळशीचे हे फायदे…

डागांपासून सुटका

तुळशीची पाने वाटून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. तुळशीत अंटी बायोटिक गुणधर्म असतात. त्यामुळे कोणतेही एलर्जी होण्यापासून संरक्षण होते.

सर्दी-खोकल्यावर परिणामकारक

तुळशीच्या पानांनी सर्दी-खोकल्यावर आराम मिळतो. रोज तुळशीची ४-५ पाने खाण्यास फायदा मिळतो.

तोंडाची दुर्गंधी दूर होते

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यास तुळस फायदेशीर ठरते. त्याचबरोबर त्याचे कोणतेही साईड इफेक्टस होत नाही.

जखम झाल्यास

जखम भरण्यास तुळशीचा फायदा होतो. यातील अंटी बॅक्टीरिअल गुणधर्मांमुळे इंफेक्शन वाढत नाही आणि जखम लवकर भरण्यास मदत होते.

दुखण्यावर

तुळशीचे तेल दुखण्यावर उपयोगी पडते. शरीरातील कोणताही अवयव दुखत असल्यास त्यावर तुळशीच्या तेलाचा प्रयोग करा. दुखण्यावर आराम मिळेल.

दमा, टीबीच्या आजारावर फायदेशीर

दमा, टीबी असल्यास तुळशीचे नियमित सेवन करा. त्यामुळे हे त्रास वाढणार नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button