हिंदू धर्मा मध्ये तुळशीच्या झाडाला किंवा रोपट्याला अतिशय महत्व आहे. तुळशी अत्यंत पवित्र मानली जाते. तसेच तुळशीला आयुर्वेदा मध्ये देखील महत्वाचे स्थान आहे. अनेक आजारावर लाभ देणारी तुळशी प्रत्येकाच्या दारात किंवा अंगणात असतेच.
परंतु काही कारणामुळे तुळशीची पाने सुकतात. यामागे तुळशीची योग्य प्रकारे काळजी न घेणे हे महत्वाचे कारण असते. काही लोक अज्ञानामुळे नकळत काही चुका करतात ज्यामुळे तुळशीची पाने कोरडी पडतात आणि नंतर तुळशीचे समाप्त होते.
खालील प्रमुख दोन कारणामुळे घरातील तुळशीचे रोप सुकते. हे कारण आपण दूर केल्यास आपल्या घरातील तुळशीचे रोपटे टवटवीत राहण्याची शक्यता वाढते.
तुळशी च्या रोपट्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नसते त्यामुळे तुळशीचे रोप लावताना या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कि रोप अश्या जागी लावावे जेथे दिवसभर प्रखर सूर्यप्रकाश येणार नाही. .
दुसरे म्हणजे तुळशीला जास्त पाण्याची देखील गरज नसते. त्यामुळे तुळशीला पाणी देताना लक्ष ठेवा तुळशीला जेवढी आवश्यकता आहे तेवढेच पाणी द्या जास्त पाण्यामुळे तुळशीच्या मुळांना नुकसान होते.
तसेच तुळशीची सुकून खाली पडलेली पाने रोपट्या पासून दूर करा. कारण त्यावर पाणी टाकल्याने पाने कुजतात आणि त्यामुळे रोपट्याला इजा पोहचू शकते.