Connect with us

थंडीच्या दिवसात तुमचे वजन वाढते का? जाणून घ्या त्यास कसे कंट्रोल करावे

Health

थंडीच्या दिवसात तुमचे वजन वाढते का? जाणून घ्या त्यास कसे कंट्रोल करावे

थंडी सुरु होताच हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात होते. बहुतेक लोकांना वाटते कि याचे कारण थंडी मध्ये खाल्ले जाणारा आहार आहे. पण वजन वाढण्याचे कारण फक्त थंडी मध्ये खाल्ले जाणारे पदार्थ किंवा फूड नाही.

परंतु यामागे अनेक कारणे असतात ज्यामुळे या वातावरणामध्ये वजन वाढते. तुम्ही देखील त्या लोकांच्या पैकी आहेत जे वजन वाढण्यामुळे चिंतीत होता तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत. चला तर पाहू थंडी मध्ये वजन वाढण्याची कारणे आणि वजन कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी सोप्प्या टिप्स. ज्यांना फॉलो करून तुम्ही सहजपणे आपले वजन थंडी मध्ये देखील नियंत्रणात ठेवून फिट राहू शकता.

थंडी मध्ये का वाढते वजन?

व्यायाम न करणे

थंडीच्या दिवसात उन्हाळ्याच्या तुलने मध्ये वेगाने वजन वाढते. थंड हवा असल्यामुळे लोक घराच्या बाहेर निघण्यास टाळाटाळ करतात, ज्यामुळे व्यायाम होत नाही. यामुळेच हळूहळू वजन वाढण्यास सुरुवात होते.

जास्त झोपणे

थंडी मध्ये दिवस लहान आणि रात्र मोठी असते, ज्यामुळे लोक जास्त झोप घेतात. यामुळे बॉडी साइकल मध्ये सुस्त पण येतो ज्यामुळे वजन वाढते.

थंडी मधील आहार

तुम्ही मौसमी फळांच्या सोबतच याकाळात मसालेदार भोजन जास्त सेवन करता आणि हे शरीरामध्ये फैट वाढवते. थंडी मध्ये आपल्याला चहा किंवा कॉफी सोबत वडे किंवा भजी, वेगवेगळ्या प्रकारचे स्नैक्स खाण्यास आवडतात. त्यामुळे शरीरामध्ये फैट आणि हाई कैलोरी जमा होते ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

मेटाबॉलिज्म अचानक वाढणे

मेटाबॉलिज्म वाढल्यामुळे वजन कमी होते पण या प्रक्रीये मध्ये एकदम वाढ झाल्यास यामुळे वजन कमी होण्याच्या एवजी वाढवते. थंडी मध्ये मेटाबॉलिज्म थोडेसे वेगाने होते.

सीजनल इंफेक्टीव डिसऑर्डर

अनेक संशोधनामध्ये समोर आले आहे कि थंडीच्या मौसमा मध्ये भूक जास्त लागते यास सीजनल इंफेक्टीव डिसऑर्डर म्हणतात.

थंडी मध्ये गोड पदार्थाचे सेवन

उन्हाळ्याच्या तुलनेत थंडीमध्ये गोड खाण्याची इच्छा जास्त होते. त्यामुळे जर शरीराला जास्तीत जास्त कैलोरी मिळाल्या तर वजन वाढणे स्वाभाविक आहे.

विंटर बेवरेजिस

थंडीमध्ये हॉट चॉकलेट, आईसक्रिम सारखे पदार्थ खाणे सर्वाना आवडतात. पण यामध्ये कैलोरी देखील भरपूर असतात. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

वजन कंट्रोल करण्यासाठी टिप्स

थंडी मध्ये जास्तीत जास्त हाई प्रोटीन ब्रेकफास्टचे सेवन करा.

हलकी-फुलकी एक्सरसाईज करा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कार्डियो एक्सरसाईज करू शकता.

पोषक तत्व असलेल्या खाद्य पदार्थांचे सेवन करा.

वजन कमी करण्यासाठी आपल्या डाइट मध्ये फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

एल्कोहल, कार्बोहाईड्रेट आणि हाई शुगर फूड्स पासून दूर राहा.

हिवाळ्यामध्ये आपल्याला वजन वाढण्याच्या समस्ये पासून वाचवण्यासाठी पुरेशी झोप घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या झोपण्याची पद्धत योग्य करा, कारण वजन वाध्याचे हे एक कारण असू शकते.

हिवाळा येताच पार्टी सीजन सुरु होतो, परंतु या दरम्यान आपल्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा.

जास्तीत जास्त पाणी प्यावे. यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते, ज्यामुळे कैलोरी बर्न होण्यास मदत मिळते.

हॉट किंवा विंटर बेवरेज घेण्या एवजी ग्रीन टी पिण्याची सवय लावा.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top