People

पावसाळ्याच्या दिवसात सापांना आपल्या घरा पासून दूर ठेवण्यासाठी करा हे प्रभावी उपाय

या जगामध्ये लोक सर्वात जास्त दोन गोष्टींना घाबरतात. या दोन गोष्टी आहेत भूत आणि साप. भूत आहेत किंवा नाहीत याचे उत्तर विज्ञान देखील देऊ शकला नाही. पण जर विचार सापाचा केला तर 99% लोक साप चावल्याने नाही मरत तर त्याला घाबरून आलेल्या हार्ट अटैकमुळे मरतात. साप विविध प्रकारचे असतात. यांची भीती सर्व वयाच्या लोकांमध्ये आहे मंग ते लहान मुले असो किंवा वयस्क व्यक्ती सापाला सर्व घाबरतात. तसे पाहता सापाच्या काही मोजक्याच जाती विषारी असतात पण तरीही लोक सर्वच प्रकारच्या सापांना घाबरतात आणि या भीतीमुळे हार्ट फेल होऊन मृत्यू होतो. एका रिसर्च मध्ये समजले आहे की भारतामध्ये फक्त 10 सापाच्या जाती आहेत ज्या चावल्याने माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

या 10 जाती मध्ये काळा नाग, कोब्रा यासारख्या खतरनाक सापाच्या जाती समाविष्ट आहेत ज्या बहुतांश जंगलात असतात. बाकी इतर जाती मध्ये रुग्णावर त्वरित उपचार केल्यास रुग्णाला सहज वाचवता येऊ शकते. साप पावसाळ्याच्या काळात सर्वात जास्त दिसून येतात आणि महाशिवरात्री नंतर पुन्हा आपल्या बिळात परत जातात. पावसाळ्याच्या काळात साप बाहेर दिसण्याचे मुख्य कारण बिळामध्ये पाणी जाणे असते. अश्या वेळी ते बिळाच्या बाहेर येतात आणि माणसासाठी धोका निर्माण करतात. सर्पदंश झाल्यास वेळीच उपचार केले नाही तर मृत्यू होऊ शकतो.

साप हे परभक्षी मानले जातात यासाठी ते नेहमी भोजनाच्या शोधात इतरत्र फिरत असतात आणि आपले अन्न शोध ते कोणाच्याही घरात घुसतात. खरतर पावसामुळे बऱ्याच जीव-जंतूंचे घर अस्तव्यस्त होतात मोडतात ज्यामुळे ते माणसाच्या घरात जळणाऱ्या दिव्यांकडे आकर्षित होतात आणि घरात येतात आणि तेथेच ते वास्तव्य करतात. सापांना किडे आणि पाल (छिपकली) खाणे आवडते त्यामुळे बऱ्याच वेळा साप हे पालीचा पाठलाग करताना माणसाच्या घरात घुसतात.

जवळपास सर्व कुटुंब पावसाळ्याच्या दिवसात आपल्या घरातील लोकांचे संरक्षण होण्यासाठी काही तरी योजना करतात. त्यामुळे तुम्ही देखील आपल्या घराला सापांच्या पासून दूर ठेवू इच्छित असाल तर आज येथे एक उपाय सांगितला गेला आहे. या उपायात तुम्हाला कार्बोनिक एसिड आणि फिनाईल घरात शिंपडावे लागेल. साप या दोन्ही एसिडला घाबरतात त्यामुळे जर घरात हे शिंपडले तर साप घरा पासून दूर राहतील. याच सोबत साप घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही अमोनिया मध्ये कापडाचे तुकडे भिजवून घरामध्ये साप प्रवेश करण्याची शक्यता असलेल्या जागी ठेवा.

या कपड्याला तुम्ही अश्या जागी ठेवा जेथे तुम्ही पूर्वी साप पाहिला होता. या उपायाने तुम्ही फक्त सापच नाही तर इतर जनावरांना देखील घराच्या आसपास फिरण्यापासून दूर ठेवू शकता. याच सोबत केरोसीन (रॉकेल) देखील साप दूर ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. रॉकेल मध्ये कापड भिजवून ते घराच्या कोपऱ्यात ठेवा किंवा घराच्या आजूबाजूला रॉकेल शिंपडू शकता. रॉकेलचा वास सापांना जराही सहन होत नाही त्यामुळे ते घराच्या आसपास फिरकणार नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button