celebrities

‘द रॉक’ याच्या करोडो रुपये फेसबुकवर वाटण्याचे सत्य

तुम्ही फेसबुकवर आपल्या स्क्रीनवर पाहिले असेल की ‘द रॉक’ लोकांना लाखो डॉलर गिफ्ट करत आहे. त्याच्या या पोस्त कदाचित तुम्ही किंवा तुमच्या मित्राने आता पर्यंत नक्कीच लाईक, शेयर आणि कमेंट केली असेल. पण आता प्रश्न हा आहे की खरोखरच रॉक एवढे पैसे लोकांना वाटत आहे का? आणि जर खरच वाटत असेल तर त्यामागचे कारण काय आहे?

सोशल मिडीया लोकांच्या मनोरंजनाच्या सोबतच त्यांना मूर्ख बनवण्यासाठी देखील वापरले जाते हे कदाचित आतापर्यंतच्या विविध घटनांवरून तुम्हाला समजलेच असेल. आता हे सर्व काही भारता मध्येच होते असे नाही तर विकसित देशात देखील लोक इतरांना वेड्यात काढून स्वताचा फायदा करून घेतात.

यावेळी ड्वेन जॉनसन ‘द रॉक’ याच्या नावाचा वापर केला गेला आहे. द रॉक हा सर्वत्र प्रसिध्द आहे. होय तोच जो पहिले WWE मध्ये मारधाड करत असे, त्यानंतर चित्रपटातून आपल्या भेटीला येत असतो तोच हा द रॉक. मागील महिन्यात त्याचा स्काईस्क्रेपर नावाचा चित्रपट आला होता. त्याच्याच नावाचा वापर करून अनेक अकाऊंट बनवले गेले आहेत. ज्यावर त्याचे रोज फोटो, व्हिडीओ अपलोड केले जातात. सोबत कैप्शन असे असते की जे पाहून कोणालाही लालच होईल आणि लाइक, कमेंट किंवा शेयर करेल. आणि लोक असे करत आहेत आणि पाहता पाहता हजारो लाखो शेयर होत आहेत.कमेंट्स पण हजारो असतात. खालील इमेजेस पहा.

कमेंट करा करोडो कमवा 1

कमेंट करा करोडो कमवा 2

कमेंट करा करोडो कमवा 3

कमेंट करा करोडो कमवा 4

आम्हाला जी पहिले आईडी मिळाली आहे त्या प्रोफाईल वर Dwahayne Jhonshon नाव आहे. स्पेलिंग मिस्टेक वरूनच समजते की हा फसवणुकीचा प्रयत्न आहे. तर वर एड्रेसबार मध्ये युजर नेम अदित सोबरी असे दिसते. आता हे सर्व तर एक जागरूक व्यक्ती पाहूनच ओळखेल की काय फालतूपणा चालला आहे.

दुसरा आईडी Dwayne J नावाने आहे. यावर देखील दररोज त्याच पद्धतीने लोकांना आमिष दाखवले जातात. जसे काय द रॉक म्हणजे कर्णाचा अवतार आहे आणि आपले सगळे पासे लोकांना वाटण्यासाठी त्याने एवढ्या मेहनतीने पैसे कमावले आहेत. या आईडीचे युजर नेम मुहम्मद जोनेट असे दिसते. यांच्या या फसवणुकीला अनेक लोक फसले आहेत.

द रॉक ने स्वतः पैसे कमावण्यासाठी किती संघर्ष केला आहे ते येथे वाचा

जर तुम्ही ड्वेन जॉनसन म्हणजेच द रॉकच्या खऱ्या वेरीफाइड पेजला भेट दिली तर त्यावर त्याने फक्त त्याची मौज मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले आहेत कोणालाही पैसे देण्याचे त्याने कोणत्याही पोस्टमध्ये लिहिले नाही.

तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेयर करा आणि आपल्या मित्रांना या फसवणुकी पासून वाचवा.


Show More

Related Articles

Back to top button