People

महिलेच्या मदतीने भिकारी अचानक बनला स्टार

ब्राजीलच्या रस्त्यावर भीक मागणारा एक व्यक्ती अचानक स्टार झाला. राइमुंडो अरुडो नावाचा हा व्यक्ती 35 वर्षा पासून रस्त्याच्या किनारी राहत होता. जवळच राहणाऱ्या एका घरातील महिला रोज त्या रस्त्याने जात असे. एक दिवस त्या महिलेचे लक्ष त्या भिकाऱ्याकडे गेले तिने पाहिले हा व्यक्ती दररोज रद्दी कागदावर काहीतरी लिहायचा. एक दिवस त्या महिलेने त्याला विचाआले की तुम्ही काय लिहित आहात. त्या नंतर त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलले.

राइमुंडो ब्राजीलच्या साओ पाउलो शहरात अनेक वर्षापासून भिक मागून आपले पोट भरत होता. फाटक्या कपड्यात आणि अस्तव्यस्त अवतारातील या व्यक्तीकडे कोणीही लक्ष देत नसे. एक दिवस शेजारील परिसरात राहणारी महिला जिचे नाव शाला मोंटीएरो आहे तीने त्याला प्रश्न विचारला त्याच्या उत्तरात तो व्यक्ती काहीही बोलला नाही आणि महिलेच्या हातामध्ये एक रद्दी कागद दिला. महिलेने त्यास लक्षपूर्वक वाचल्यावर तिच्या लक्षात आले कि ती एक अतिशय सुंदर कविता होती.

महिलेने फेसबुक वर त्याची गोष्ट सांगितली

शाला समजली की हा व्यक्ती वर्षानुवर्षे रस्त्याच्या किनारी बसून कविता लिहित होता. शाला अनेक दिवस तिला भेटण्यास गेली. प्रत्येक वेळी तो तिला एक नवी कविता देत असे. त्यामुळे प्रभावित होऊन त्या महिलेने एक कविता फेसबुकवर शेयर केली. ज्यास लोकांनी भरपूर पसंत केले. जेव्हा काही लोकांना विश्वास बसला नाही की एक भिकारी देखील असे करू शकतो तेव्हा शालाने त्याचे एक पेज बनवले आणि फोटोज पण अपलोड केले.

पाहता पाहता 1 लाख फॉलोअर्स झाले

शालाने राइमुंडोच्या नावाने एक फेसबुक पेज बनवून त्यावर कविता शेयर केल्या, त्या लोकांना खूप आवडल्या. पाहता पाहता राइमुंडोचे लोक फैन झाले आणि 1 लाख लोक त्याच्या पेजला फॉलो करू लागले. फेसबुक वर Raimundo Arrudo Sobrinho नावाच्या पेजवर आता 2 लाख फॉलोअर्स झाले आहेत.

मेकओवर केल्यावर समजले की तो एक भिकारी नाही तर एक व्यापारी होता

राइमुंडो जेव्हा फेमस झाला तर लोक त्याला भेटण्यासाठी येऊ लागले. त्याचे पेज बनवणाऱ्या महिलेने त्याचा मेकओवर करून घेतला. त्याने अनेक वर्षा पासून अंघोळ देखील केली नव्हती. शाला ने त्याचे केस आणि दाढी कापून घेतले. नवीन कपडे घालण्यास दिले आणि त्यानंतर त्याला ओळखणे कठीण झाले. पण त्याचे हे नवीन रूप पाहून फेसबुक वर त्याच्या भावाने त्याला ओळखले. त्यानंतर समजले की राइमुंडो हा एक व्यापारी होता जो मिलिट्रीच्या तानाशाहीमुळे घरा पासून दूर गेला होता आणि पैसे नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली होती.


Show More

Related Articles

Back to top button