astrology

धनवान बनण्याची इच्छा पूर्ण करेल हा तोडगा, महालक्ष्मीची होईल कृपा

हल्लीच्या काळामध्ये पाहिले तर प्रत्येक व्यक्ती हा पैसे कमावण्याची इच्छा बाळगून आहे. प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्याच्या चिंतेत आहे. आपल्याला असा कोणताही व्यक्ती मिळणार नाही कि ज्याला पैश्याची गरज नाही, जवळपास सगळ्याच लोकांना पैश्याची आवश्यकता असते ज्यासाठी तो दिवसरात्र मेहनत घेत असतो. पण अनेक वेळा मेहनत करून देखील व्यक्तीला नशिबाची साथ मिळत नाही, ज्यामुळे त्याला नेहमी पैश्याची कमी जाणवते. प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि त्याच्या जवळ भरपूर पैसे असावेत, महागडी गाडी असावी, सुंदर घर असावे इत्यादी मोठमोठी स्वप्न प्रत्येक व्यक्तीची असतात पण हि सगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैश्याची गरज असते. पैश्याची किंवा धनाची कमी असल्यामुळे लोक आपल्या या आवश्यकता पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यांना अनेक समस्यांचा सामान करावा लागतो.

बहुतेक वेळा लोकांकडे पैसे येतात परंतु ते त्यांच्याजवळ टिकत नाहीत, ज्यामुळे ते आपले जीवन अत्यंत कठीण परिस्थितीत जगत असतात. जर आपल्याला वाटत असेल कि आपल्या जीवनातील धनाच्या संबंधित समस्या दूर झाल्या पाहिजेत तर आपण या पोस्ट मध्ये काही सोप्पे तोडगे जाणून घेणार आहोत ज्यांचा आपल्याला धनाची कमी दूर करण्यास मदत होऊ शकते. जर आपल्याला धन कमवायचे असेल तर धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असणे आवश्यक आहे. आपण हे उपाय करून माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो.

चला पाहू धनवान बनण्याचे हे तोडगे

हे आपण शास्त्रा नुसार पाहिले तर व्यक्तीला जर आपल्या धनाच्या संबंधित समस्याच दूर करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे. तांदूळ (भात) हे धान्य शुक्र ग्रहांच्या संबंधित मानले जाते त्यामुळे कोणत्याही पूजे मध्ये देवी देवतांना तिलक केल्या नंतर तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण केल्या जातात. माता लक्ष्मीच्या पूजे मध्ये देखील अक्षतांना महत्व आहे, आपण माता लक्ष्मीला अर्पित केलेल्या अक्षतांपैकी 21 दाणे एका कागदा मध्ये पुडी बांधून आपल्या पर्स मध्ये ठेवा, जर आपण असे केले तर यामुळे शुक्र ग्रहा सोबत माता लक्ष्मीच्या संबंधित सगळे सकारात्मक फळ प्राप्ती होईल.

पिंपळाच्या पानांमध्ये भगवान विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते. या पिपळाच्या पानांना गंगाजलाने धुवून पवित्र करा, आता या पिंपळाच्या पानावर केसर वापरून ‘श्री’ लिहावे आणि यास आपल्या पर्स मध्ये अश्या जागी ठेवावे ज्यामुळे कोणाचीही नजर त्यावर पडणार नाही. नियमित वेळे नंतर हे पान बदलावे, जर हा उपाय केला तर धनाच्या संबंधित समस्या दूर होऊ शकतात.

आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल कि पर्स आणि चावी कधीही टेबलावर ठेवली नाही पाहिजे कारण असे मानले जाते कि असे घरामध्ये तंगी येते त्यामुळे आपण या वस्तूंना अश्या जागी ठेवावे जेथे कोणत्याही व्यक्तीची नजर पडणार नाही आणि हे सुरक्षेच्या दृष्टीने देखील उत्तम राहील.

जर आपण कोणत्याही गुरूला किंवा परमेश्वराला मानत असाल तर आपल्या पर्स मध्ये त्यांचा फोटो ठेवा जर आपण आपल्या गुरुचे किंवा आपली श्रद्धा असलेल्या देवाचे फोटो पर्स मध्ये ठेवले तर आपल्याला पैश्यांच्या संबंधित समस्या उत्पन्न होणार नाहीत, असे मानले जाते कि असे फोटो पर्स मध्ये ठेवल्याने आपला वाईट काळ दूर होतो आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते, त्यामुळे आपल्या पर्स मध्ये असे फोटो ठेवावेत.


Show More

Related Articles

Back to top button