People

किन्नर अखाडा – बद्दल खास गोष्टी आणि त्यांचे नियम जे तुम्हाला माहीत नसतील

तृतीयपंथी आणि त्यांच्या जीवना बद्दल माहीती करून घेण्यास सामान्य माणसाला नेहमीच उत्सुकता असते. कारण त्यांचे संपूर्ण जीवन हेच मुळात ते एक रहस्यमय पद्धतीने जगत असतात. येथे आपण त्यांचा कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या अखाडा कसा होता त्यांचे काय नियम होते इत्यादी बद्दल माहीती करून घेणार आहोत.

मध्यप्रदेश मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तृतीयपंथी लोकांचा अखाडा सहभागी झाला होता. किन्नर आखाड्याची महाराष्ट्र पीठाधीश्वर पायल गुरुच्या अनुसार त्यांनी हा आखाडा तृतीयपंथी लोकांची समाजातील प्रतिमा बदलण्यासाठी केला आहे. तृतीयपंथी लोकांची प्रतिमा समाजात लग्न आणि मुलाचा जन्म झाल्यावर पैसे मागणारे असा आहे ही प्रतिमा बदलने त्यांचा उद्देश आहे.

तृतीयपंथी लोकांच्या आखाड्यास सन्यासी आखाडा आणि अखाडा परिषदेने मान्यता दिलेली नाही. इतर शैव आणि वैष्णव आखाड्या प्रमाणे यांनी पण काही नियम केले आहे. या नियमांना मानणारेच या आखाड्यात शामिल होऊ शकतात.

किन्नर आखाड्याने ठरवलेले काही नियम

किन्नर आखाड्यामध्ये त्यांची कुलदेवी बहुचरा माता हीची सर्वात पहिले पूजा केली जाते. यामातेचे मंदिर गुजरात मधील अहमदाबाद मध्ये आहे. बहुचरा मातेला मुर्गे वाली माता पण बोलले जाते, तृतीयपंथी या देवीस आपली कुलदेवी मानतात.

तृतीयपंथी लोकांनी संपूर्ण देशामध्ये आपले मठ बनवले आहे. यामठाची संख्या दहा आहे. या दहा मठामध्ये त्यांनी पीठाधीश्वर सुध्दा नेमले आहेत.

संपूर्ण देशात गुरु-शिष्य परंपरेच्या अनुसार तृतीयपंथी लोकांना आखाड्यात सामील केले जात आहे.

तृतीयपंथी आखाड्यात सामील होण्यासाठी पहिली अट ही आहेकी त्याला ते सर्व काम सोडावे लागतील जे आता पर्यत ते करत आले आहेत.

देशामध्ये जे 10 मठ बनवले गेले आहेत त्यापैकी एका मठाच्या पीठाधीश्वर त्यांनी गुरु म्हणून मान्य करावा लागेल.

जो कोणी तृतीयपंथी या आखाड्यात शामिल होईल त्याला आखाड्याचे नियम पाळावेच लागतील त्यानंतरच त्याला दीक्षा दिली जाईल.

किन्नर आखाड्यात संतांचे वेगवेगळे पद असतील, जसे अखंड महामंडलेश्वर, महामंडलेश्वर, महंत इत्यादी

सिंहस्थच्या दरम्यान किन्नर आखाड्यात अनेक यज्ञ होतील. त्यासाठी किन्नर पंडित पण देशातील दहा मठा मधून येतील.

 


Show More

Related Articles

Back to top button