entertenment

10 पैसे पासून ते 1800 रुपया पर्यंतची चैनल लिस्ट, जाणून घ्या तुम्ही जे चैनल पहाता ते कितीला पडणार

केबल ऑपरेटर्स आणि डीटीएच साठी 29 डिसेंबर पासून नवीन नियम लागू होणार आहेत. यानंतर ग्राहकांकडून मनमानी रक्कम वसूल करता येऊ शकणार नाही. सोबतच टीव्ही ब्रॉडकास्टर्सना मैक्सिमम रिटेल प्राइस (MRP) देखील डिस्क्लोज करावी लागेल. ट्राई ने आपल्या ऑफिशियल वेबसाइटवर पेड चैनल्सची लिस्ट प्रकाशित केली आहे.

यामध्ये 42 ब्रॉडकास्टर्सचे एकूण 332 चैनल्सची प्राईज लिस्ट आहे. प्रत्येक चैनलची किंमत 10 पैसे पासून ते 1800 रुपये पर्यंत आहे. 29 डिसेंबर नंतर ग्राहकांना आपल्या आवडीच्या चैनल्सचे फक्त पैसे द्यावे लागतील. झी एंटरटेनमेंट, सोनी पिक्चर्स आणि स्टार इंडिया ने आपल्या चैनल्सचे पैक सार्वजनिक केले आहेत. तसेच सगळ्या चैनल्सचे रेट देखील सांगितले आहेत.

Zee चे आहेत सगळ्यात जास्त चैनल

पेड चैनल्स मध्ये सगळ्यात जास्त Zee ग्रुपचे चैनल्स आहेत. यानंतर स्टार इंडिया आणि TV18 ग्रुपचे नाव येते. स्टार इंडियाचे एकूण 51 पे चैनल्स आहेत. यामध्ये 23 चैनल्स 19 रुपये एमआरपी वाले आहेत, पाच चैनल 1 रुपया किमतीचे. जर तुम्ही याचे संपूर्ण पैकेज घेतले तर मंथली यासाठी 646 रुपये द्यावे लागतील.

Zee चे एकूण 41 चैनल्स आहेत यामध्ये 19 चैनल 19 रुपये वाले आहेत. झी एंटरटेनमेंटच्या पे चैनलची एवरेज प्राईज 12.32 रुपये आहे.

सोनी चे 25 पे चैनल्स आहेत. एवरेज प्राईज 12 रुपये प्रतिमहिना आहे. सगळया चैनल्सचा एकूण मंथली पैक 301 रुपयाच्या आसपास होईल.

चेन्नई बेस्ड ब्रॉडकास्टर सन चे 33 पे चैनल्स आहेत एवरेज प्राईज 11 रुपये प्रतिमहिना आहे.

वॉयकॉम-18 चे टोटल 32 पे चैनल्स आहेत. यांची एवरेज प्राईज 7.80 रुपये आहे. 32 चैनल्सची टोटल प्राईज 250 रुपये प्रतिमहिना होते.

या व्यतिरिक्त टाइम्स ग्रपु, डिस्कवरी, टीवी18 न्यूज, जी न्यूज, एनडीटीवी चे चार्जेस इतर चैनल्सच्या तुलनेत कमी आहेत.

ट्राई कडून प्रकाशित केलेल्या लिस्टमध्ये पहा कोणता चैनल किती एमआरपी घेणार आहे.


Tags
Show More

Related Articles

Back to top button