Connect with us

नवऱ्याची मागणी – पोळी 20 सेंटीमीटर व्यासाची असली पाहिजे, पत्नी ने घेतला हा निर्णय

People

नवऱ्याची मागणी – पोळी 20 सेंटीमीटर व्यासाची असली पाहिजे, पत्नी ने घेतला हा निर्णय

घटस्फोटासाठी आलेल्या एका अर्जात पत्नीने कारण सांगितले आहे की पतीला पोळी 20 सेमी व्यास असलेल्या लागतात. पत्नीने पती विरुध्द घरगुती हिंसाचाराची तक्रार केली आहे. पत्नीचे म्हणणे आहे की आईटी इंजिनियर पतीला पोळीचा व्यास 20 सेमी पाहिजे. असे न केल्यास मारहाण करतो. कंटाळून महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला.

महिलेचे म्हणणे आहे की त्यांचे लग्न दहा वर्षा पूर्वी २००८ मध्ये झाले. आईटी क्षेत्रात काम करणारा तिचा नवरा तिच्या कडून अतिपूर्णता (ओवरफुलनेस) ची अपेक्षा करतो. त्याला दिवसभरात केलेल्या कामाचा तपशील एक्सेल शीट मध्ये वेगवेगळ्या रंगात अपडेट करून पाहिजे. जर ठरलेले काम झाले नाही तर ते काम नाही झाल्याचे कारण लिहिण्यासाठी वेगळा कॉलम आहे. जर एखादी सेल किंवा खाना रिकामा ठेवला तर त्यावरून तो शिवीगाळ, अपमान आणि मारहाण करतो. पोळीचा व्यास बरोबर आहे किंवा नाही हे तो मोजतो.

पत्नीने पुढे आपल्या व्यथे मध्ये सांगितले की पती शरीरावर थंड पाणी टाकतो आणि एसी सुरु असलेल्या रूम मध्ये कोंडून ठेवतो. त्याने अनेक वेळा दबाव टाकला की मी आत्महत्या करू. पण आमची एक मुलगी आहे आणि तिचा विचार करून मला मरताही येत नाही आणि जिवंतही राहता येत नाही आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top