Connect with us

या तीन सवयी करतात लीवर खराब, आज पासूनच रहा सावधान

Health

या तीन सवयी करतात लीवर खराब, आज पासूनच रहा सावधान

लीवर माणसाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. हा पोटामधील पचनक्रिया होण्यासाठी अनेक प्रकारचे रस तयार करतो आणि त्यांचे डिटॉक्सीफिकेशन करतो. हल्लीच्या तरुण पिढीचे बिघडलेले खानपान त्यांना अनेक प्रकारच्या लीवर संबंधी आजार देत आहेत. जर एखाद्याचे लीवर खराब झाले तर त्याला ट्रांसप्लांट करण्याच्या शिवाय दुसरा कोणताच मार्ग शिल्लक राहत नाही. तर योग्य लीवर न मिळण्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. खराब लीवरमुळे हेपेटाइटस ए, बी, सी आणि डी लोकांना अशक्त करतो.

याशिवाय खराब लीवर असल्यामुळे जोन्डीस आणि कवील सारखे घातक आजार होऊ शकतात. खरतर लीवर हे मनुष्य शरीरातील एक अजब गजब कलाकृती आहे. त्यामुळे लीवरची काळजी घेणे आवश्यक आहे. मानव शरीरात असे अनेक अंग आहेत जे खराब झाल्यावर व्यक्ती जिवंत राहू शकत नाही त्यामधीलच एक आहे लीवर. आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगत आहोत माणसाच्या अश्या 3 सवयी ज्यांच्यामुळे आपण स्वताच आपले लीवर खराब करत आहोत.

या सवयी करतात लीवर खराब

फास्ट फूड सेवन करणे:

आजच्या नवीन पिढीला हिरव्या पालेभाज्यांच्या पेक्षा जंक फूड आणि फास्ट फूड खाणे जास्त आवडते. मंग ते नुडल्स, पिज्जा, बर्गर किंवा मंचुरियन असो, हे सर्व प्रकारचे जंक फूड आजकालच्या युथ जनरेशनचे आवडते भोजन झालेले आहे. या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात तेल आणि मसाले असतात ज्यांच्या मध्ये अनेक प्रकारचे हानिकारक आणि विषारी तत्व असतात. या हानिकारक तत्वांचे प्रमाण शरीरात जास्त वाढल्यामुळे माणसाचे लीवर हळूहळू काम करणे बंद करते.

मद्यपानाची सवय:

आजकाल मद्यपान हे हाय सोसाईटमध्ये फैशन झाले आहे. मद्यपान हे लीवर फेल करण्यासाठी सर्वात मोठे कारण आहे. तसे थोड्या प्रमाणात मद्यपान चालू शकते पण मोठ्या प्रमाणात मद्यपान लीवर खराब करते. यामुळे काही काळातच लीवर फेल होते. बहुतांश लोकांचे लीवर खराब होण्याचे कारण मद्यपान आहे ज्यामुळे अनेक वेळा डॉक्टर त्यांचे प्राण वाचवू शकत नाहीत.

झोप पूर्ण न होणे:

डॉक्टरांच्या नुसार एका प्रौढ व्यक्तीला दररोज 6 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. पण आजची युवा पिढी रात्रभर मोबाईल आणि इंटरनेटवर चैटिंग करण्यात व्यस्त राहते ज्यामुळे झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न होण्याचा सरळ परिणाम लीवरवर होतो. यामुळे आपले लीवर डैमेज होऊ शकते. यासाठी जर तुम्ही पण 6 ते 8 तासांच्या पेक्षा कमी झोप घेत असाल तर सावध रहा. कारण एक छोटीशी चूक धोकादायक ठरू शकते.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top